एक्स्प्रेस थांब्याबाबत आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:17+5:302021-09-12T04:36:17+5:30
देवरुख : नेत्रावती व मत्सगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वररोड स्थानकात थांबा मिळविण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक या संस्थांतर्फे गेले ...

एक्स्प्रेस थांब्याबाबत आज बैठक
देवरुख : नेत्रावती व मत्सगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वररोड स्थानकात थांबा मिळविण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक या संस्थांतर्फे गेले अनेक दिवस प्रयत्न करीत आहेत. याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी १२ रोजी संगमेश्वर कसबा येथील जोगेश्वरी कालभैरव मंदिरात बैठकीचे आयोजन केले आहे.
चिपळूण व संगमेश्वर फेसबुक या समूहाचे प्रमुख आणि समन्वयक यांनी नेत्रावती व मत्सगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वररोड स्थानकात थांबा मिळविण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट रोजी कोकण रेल्वेचे संजय गुप्ता यांच्याबरोबर एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार शेखर निकमही उपस्थित होते. यावेळी संजय गुप्ता यांनी लवकरात लवकर सकारात्मक मार्ग काढू, असे लेखी पत्राद्वारे आंदोलकांना कळविले होते. त्यांच्या आश्वासनांचा सन्मान राखीत १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणारे उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर कोकण रेल्वेला पत्र देऊन वेळ आणि कालावधी याची माहिती एक महिन्यात देण्याची मागणी करण्यात आली हाेती. मात्र, अद्याप कार्यालयाकडून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही.
आता एक महिना पूर्ण होत आहे. त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर चाकरमनी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रविवार, १२ रोजी सकाळी ११ वाजता श्री कालभैरव जोगेश्वरी मंदिर, कसबा (ता. संगमेश्वर) येथे एक सभा आयोजित केली आहे. कोविड-१९चे सर्व शासकीय नियम पाळून ही सभा होणार असून, ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी सांगितले.