आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:27+5:302021-09-02T05:06:27+5:30
शेतकऱ्यांना मार्गदर्शन दापोली : तालुक्यातील केळशी येथील इंडो इस्त्रायल कृषी प्रकल्पांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता जिल्ह्यांतर्गत निवड झालेल्या ...

आज बैठक
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दापोली : तालुक्यातील केळशी येथील इंडो इस्त्रायल कृषी प्रकल्पांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता जिल्ह्यांतर्गत निवड झालेल्या केळशी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रा. महेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
गणपती सजावट स्पर्धा
खेड : येथील युवा सेनेतर्फे दिनांक १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यास ५००१, उपविजेत्यास ३००१ व तृतीय क्रमांकास २००१ रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिर
खेड : सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे नगर परिषद सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाड येथील जनकल्याण रक्तसाठा केंद्राचे शिबिरासाठी सहकार्य लाभले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, युवक तालुका अध्यक्ष अश्विन भोसले उपस्थित होते.
५ सप्टेंबरला आंदोलन
देवरुख : मुंबई - गोवा महामार्गासाठी कोकणवासीय ५ सप्टेंबर रोजी चिपळूण येथे काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुुंबई - गोवा महामार्गाचे काम जलदगतीने व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समितीतर्फे जनआंदोलन आयोजित केले आहे.