चिपळुणात ज्येष्ठ नागरिकांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:03+5:302021-08-23T04:34:03+5:30
चिपळूण : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांची सभा घेतली. ...

चिपळुणात ज्येष्ठ नागरिकांची सभा
चिपळूण : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शनिवारी चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांची सभा घेतली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणींबाबत काही सूचना केल्या.
श्वानांचा उच्छाद वाढला
चिपळूण : शहरात सध्या मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर व महामार्गावर झुंडीच्या झुंडीने ते उभे असतात. अनोळखी व्यक्ती किंवा दुचाकीस्वार आल्यास त्यांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मदतीपासून अजूनही वंचित
रत्नागिरी : कोरोना कालावधीत रिक्षा व्यावसायिकांसाठी राज्य शासनाने १,५०० रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, अजूनही जिल्ह्यातील अनेक रिक्षा व्यावसायिकांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने रिक्षा व्यावसायिकांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
माळवाशीनजीक रस्त्याला खड्डे
देवरुख : देवरुख-रत्नागिरी मार्गावर माळवाशी भालेकरवाडीनजीक खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी मोऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे कच्चे काम करण्यात आले होते. या रस्त्याचे काम पाऊस गेल्यावर करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
पूल वाहतुकीसाठी धोकादायक
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मेघी येथील बावनदीवरील पुलाच्या कठड्याची दुरवस्था झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत या पुलावरून नदीचे पाणी गेल्याने कठडा जागोजागी तुटला आहे. त्यामुळे या पुलावर पुन्हा पहिल्यासारखा पक्का कठडा होणे आवश्यक आहे.