शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांच्या समस्यांबाबत ५ एप्रिलला ‘सह्याद्री’वर बैठक, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:31 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला.

राजापूर : राज्यातील चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी मच्छिमारांच्या समस्यांचे निवारण होऊन न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. मच्छिमारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्व आमदारांसमवेत ५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथिगृह येथे बैठकीचे आयोजन केल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, अनेक वादळे, कोविडमुळे कोकणातील मच्छिमारांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमाऱ्यांनाही आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेण्यात आलेली छोट्या मुदतीचे कर्ज व व्याज माफ करण्यात येणार का? तसेच कोकणातील नौकाधारक मच्छिमारांच्या डिझेल परतावा फेब्रुवारी २०२३ अखेर २७३.५१ कोटींचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला असून, उर्वरित १२२ कोटी रूपये डिझेल परतावा मिळणार का? तसेच डिझेल साठविण्यासाठी डिझेल डेपोची आवश्यकता असून, त्याप्रमाणे निर्मिती केली जाणार का? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यामध्ये अनधिकृत बोटी मोठ्या प्रमाणत असून, त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे मान्य केले. तसेच नौकाधारक मच्छिमारांना मिळणारा डिझेल परतावा विशेष बाब म्हणून एप्रिलमध्येच सर्व डिझेल परतावा वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच डिझेल परतावा नियमित कसा केला जाईल याबाबत उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. त्याचबराेबर किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या कर्जाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFishermanमच्छीमार