शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्वातंत्र्य दिनादिवशीच झाली हरवलेल्या आईची मुलाशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:26 AM

पाच महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आईची स्वातंत्र्य दिनीच रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने मुलाशी भेट घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनादिवशीच झाली हरवलेल्या आईची मुलाशी भेट रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्टानने घडविली भेट

रत्नागिरी : पाच महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आईची स्वातंत्र्य दिनीचरत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने मुलाशी भेट घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले.रतीबाई श्यामलाल साहू (६५) असे या वृद्धेचे नाव असून, त्या १२ मार्च २०१९ रोजी बेपत्ता झाल्या होत्या. मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील कुरवाई (ता. बरेरवाडी) हे त्यांचे गाव. वयानुसार त्यांना थोडे विस्मरण होत होते. १२ मार्च रोजी त्या नातेवाईकांकडे जाते असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या.

शोधाशोध केल्यानंतरही त्या न मिळाल्याने मुलगा आसाराम याने पोलीस स्थानकात माहिती दिली. चुकीच्या बसमध्ये त्या बसल्या आणि अनोळखी ठिकाणी पोहचल्या. घराच्या ओढीने त्या मिळेल ती बस पकडत होत्या. मध्यप्रदेशमधून २७ दिवसानंतर त्या संगमेश्वरमध्ये पोहचल्या.संगमेश्वर - देवरुख मार्गावर ८ एप्रिलच्या रात्री त्या चालत होत्या. याच दरम्यान बुरंबी येथील पराग नाईक दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी त्यांना ही वृद्धा दिसली. त्याचदरम्यान घरी जाणारे जे. डी. पराडकर हे त्याठिकाणी आले. दोघांनी रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानशी संपर्क साधला.

राजरत्नचे सचिन शिंदे आणि त्यांच्या कार्यर्त्यांनी त्यांना रत्नागिरीत पाठविण्यास सांगितले. जे. डी. पराडकर यांनी त्यांना घरातून जेवण आणून दिले, तर पराग नाईक यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून त्या वृद्धेला रत्नागिरीत पाठविले.रत्नागिरीत आल्यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आंघोळ घालून मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरुग्णालयात डॉ. अमित लवेकर आणि सोशलवर्कर डॉ. शिवदे त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते. त्याचदरम्यान शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी बोलून खात्री करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून १५ ऑगस्ट रोजी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRatnagiriरत्नागिरी