शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा तीन वर्षांचा नवीन अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:09+5:302021-07-10T04:22:09+5:30
रत्नागिरी : दहावीनंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी ३० जूनपासून सुरू झाली आहे. ज्या ...

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा तीन वर्षांचा नवीन अभ्यासक्रम
रत्नागिरी : दहावीनंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी ३० जूनपासून सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसेल, त्यांनी अर्जात तो पर्याय रिकामा सोडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. यावर्षी मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा तीन वर्षांचा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला आहे.
ऑनलाइन अर्जासाठी ३० जून ते २३ जुलै हा कालावधी आहे. या कालावधीत कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्यात येणार आहे. २६ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यावरील आक्षेप असल्यास ते २७ ते २९ जुलै या कालावधीत नोंदवता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ३१ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने ऑनलाइन अर्जामध्ये त्यांना केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थ्यांना E-Scrutiny (Online Scrutiny) व P-Scrutiny (Offline Scrutiny) असे दोन पर्याय दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी अदिती आ. मुळये ९८९०४७६९९५, वि. ब. ढोकणे ९४२१००७५९२, सु. सु. पांडे, श्री. स. मस्के या प्राध्यापकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क करून तसेच प्रत्यक्ष मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रास भेट देऊन मिळविता येईल. प्रवेश प्रक्रियेसाठी संचालकीय स्तरावर मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून, ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर वरील वेळेत संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी http://poly21.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औ. म. जाधव यांनी केले आहे.
.