शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील चिपळुणात गोवरचा रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:15 IST

हा बालक मुंबईतून चिपळुणात आल्याचे आले समोर

रत्नागिरी : राज्यात गोवरच्या साथीचा उद्रेक झालेला असतानाच चिपळूण तालुक्यात एक बालक गोवरने आजारी असल्याचे आढळून आले आहे. हा बालक मुंबईतून चिपळुणात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, हा बालक राहत असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरात अन्य कोणाला गोवरची लागण झाली आहे का, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच राज्यात मुंबई, भिवंडी, मालेगाव व अन्य शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याने राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने राज्यभरातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेकडून गोवरबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील गोवर संशयित २२ बालकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी मुंबईतून आलेल्या बालकाला गोवर झाल्याचे स्पष्ट झाले असून, अन्य २१ बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही आरोग्य विभाग जिल्ह्यात गोवरबाबत सतर्क आहे.जिल्ह्यातील ८,९५३ बालकांचे गोवरचे लसीकरणरत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश बालकांना नवव्या महिन्यातच गोवरचे लसीकरण करण्यात येते. लसीकरण वेळीच करण्यात येत असल्याने गोवरचे रुग्ण नाहीत. जिल्ह्यातील ८,९५३ बालकांना गोवरची लस दिलेली आहे. मात्र, गोवरने आजारी असलेले बालक हे मुंबईतून आलेले आहे. तरीही आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य