कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते गोवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:45+5:302021-08-24T04:35:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गोवर-रुबेला या विषाणूजन्य आजारामुळे बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती आणि एकाग्रतेवर आघात होत असल्याने २०१८ ...

कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते गोवर
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गोवर-रुबेला या विषाणूजन्य आजारामुळे बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती आणि एकाग्रतेवर आघात होत असल्याने २०१८ बालकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, हा आजार नियंत्रणात आला असला तरी कुठल्याही व्यक्तीला जाप आणि पुरळ आल्यास ते गाेवर आणि रुबेलाचे लक्षण असू शकते.
गाेवर आणि रुबेला हा आजार बालकांनाच होत असल्याचा समज होता. मात्र, आता कुठल्याही वयाेगटातील व्यक्तीला हा विषाणूजन्य आजार होऊ शकतो. गर्भवतीला हा आजार झाल्यास तिच्या बाळालाही याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ताप आणि पुरळ आल्यास लगेचच निदान होणे गरजेचे आहे.
......................................
असे केले जाते निदान...
गोवर आणि रुबेलाची बारीक ताप आणि पुरळ ही मुख्य लक्षणे आहेत.
हे दोन्ही आजार विषाणूजन्य असून तापाबरोबरच सर्दी-खोकला याचाही त्रास होतो.
डोळ्यांना लाली येते आणि जळजळ होते. हा आजार संसर्गजन्य आहे.
या आजारासाठी कुठल्या वेगळ्या चाचण्या न करता लक्षणांवरून निदान होते.
...................................................
गोवर-रुबेलाचे ८२ टक्के लसीकरण...
गाेवर आणि रुबेलामुळे बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती आणि एकाग्रतेवर आघात होतो.
२०१८ मध्ये ९ महिने ते १५ वर्षे वयाेगटातील बालकांसाठी केंद्रस्तरावर प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली
७ नोव्हेंबर २०१८ ते ३ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ३५७ बालकांना ही प्रतिबंधक लस देण्यात आली.
........................................................
...तर डाॅक्टरांना दाखवा
बारीक ताप आणि पुरळ आल्यास ही गोवर-रुबेलाची लक्षणे असतात.
जाेडीला सर्दी-खोकला, डोळे लाल ही लक्षणे दिसताच डाॅक्टरांना दाखवा.
.....................................
गोवर आणि रुबेला हे दोन्ही आजार विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आहेत. बारीक ताप, पुरळ तसेच सर्दी-खोकला, डोळे लाल ही मुख्य लक्षणे आहेत. गर्भवती मातेला हा आजार झाल्यास तिच्या बाळाला हा आजार होण्याचा धोका असतो. या आजाराचे निदान कुठल्या चाचणीद्वारे होत नाही तर ते लक्षणांवरून केले जाते. हा आजार लहानानांच नव्हे तर मोठ्यांनाही होण्याचा धोका असतो.
- डाॅ. संतोष बेडेकर, बाल रोगतज्ज्ञ, रत्नागिरी