शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav 2024: रत्नागिरीतील मयूर भितळे यांच्या चलचित्र देखाव्यात शेतकऱ्यांच्या व्यथा

By शोभना कांबळे | Updated: September 9, 2024 18:18 IST

रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या ...

रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या तरुणाने शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा हा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच भक्तांना पाहण्यासाठी खुला केला आहे. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत (१७ सप्टेंबर) पाहता येणार आहे.मयूर भितळे इलेक्ट्रिशियन आहेत. गेली सहा वर्षे ते विविध विषयांवर देखावे सादर करीत आहेत. गोवर्धन पर्वत, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू यांना पावनखिंडीत ठेवून विशाळगडाकडे केलेली कूच, नारळातील गणपती आदी हुबेहूब देखावे त्यांनी केले आहेत. चलचित्र देखावा त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच केला होता. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनातील प्रमुख चार कष्टप्रद घटनांवर आधारित चलचित्र देखावा मयूर भितळे यांनी गतवर्षी केला होता. त्यांच्या या देखाव्याची प्रशंसाही झाली होती.या चलचित्र देखाव्यातून प्रेरणा घेऊन यंदा भितळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या देखाव्यातून मांडल्या आहेत. कोकणातील शेती आता अनिश्चित झाली आहे. पाऊस लहरी झाल्याने शेती चांगली होईल, याची शाश्वती नाही, तर काही वेळा त्याच्या जमिनीवरच अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत. यातूनच आता शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून, शेतकऱ्यांची मुले आता रोजगारासाठी गाव सोडून शहरात जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मयूर भितळे यांनी त्यांच्या या व्यथा या चलचित्र देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.मयूर भितळे यांनी अतिशय अल्प कालावधीत हा देखावा तयार केला आहे. यासाठी त्यांना अनिकेत बाणे, मारुती लोहार, सौरभ मांडवकर, अभिजित आलीम यांचे सहकार्य मिळाले, तसेच रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल योगेश सुरेश दोरखंडे यांनी विशेष साहाय्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Farmerशेतकरी