शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चिपळूणच्या नगराध्यक्ष दाद मागणार जनतेच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:51 IST

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच शहरात भाजपच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपण केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या आरोपांना थेट जनतेच्या दरबारात उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देचिपळूणच्या नगराध्यक्ष दाद मागणार जनतेच्या दरबारात अभियानाच्या माध्यमातून विकास कामांची माहिती

चिपळूण : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच शहरात भाजपच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपण केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या आरोपांना थेट जनतेच्या दरबारात उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.अवघ्या काही महिन्यांवर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक येऊन ठेपली आहे. शहरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रतिस्पर्धी पक्षांनी एकत्रित येत भाजपला रोखायचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षांना लक्ष्य करण्यात आले आहे.

संख्येच्या बळावर विकासकामेही रोखली जात आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून नगर परिषद फंडातून होणारी कामे थांबली आहेत. मागील निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी शहरातील रस्ते कामांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून ती कामे थांबवली होती.

आता महाविकास आघाडीने संख्याबळाच्या जोरावर विकासकामे थांबवून त्याचे खापर भाजपवर फोडण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, नगराध्यक्षांनी दोन पावले पुढे जात आपण मागील चार वर्षात किती कामे केली ते सांगताना आपल्याला कोणी आणि कसा विरोध केला, महिला नगराध्यक्ष असताना आपल्याला किती संघर्ष करावा लागला, याची माहिती संपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारांना देण्यास सुरुवात केली आहे.या संपर्क अभियानाचा प्रारंभ नगराध्यक्षा खेराडे यांनी अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर यांच्या प्रभागातून केला आहे. केळस्करांच्या प्रभागात जावून नगराध्यक्षांनी त्यांच्यावरच तोफ डागली आहे. भाजपचे शहरप्रमुख आशिष खातू, नगरसेविका रसिका दांडेकर यांना घेऊन त्यांनी बहादूरशेख नाका, वडार कॉलनी, काविळतळी येथे मतदारांच्या बैठका घेतल्या. यावेळी खेराडे यांनी आपल्यावरील विरोधकांच्या आरोपांचे खंडनही केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाRatnagiriरत्नागिरी