रत्नागिरी : गुहागरमधील शृंगारतळी येथे गणेश नगरमधील गादी कारखान्याला मोठी आग लागली. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमाराला घडली.गादी कारखाना वस्तीच्या ठिकाणी असल्यामुळे परिसरात मोठी धावपळ सुरु झाली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी दाभोळ पावर प्रोजेक्टमधून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी: गुहागरात गादी कारखान्याला आग, लाखोंचे नुकसान
By अरुण आडिवरेकर | Updated: November 3, 2022 12:20 IST