ग्रामसेवक युनियनकडून कोविड सेंटरला साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:40 IST2021-04-30T04:40:18+5:302021-04-30T04:40:18+5:30
राजापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या राजापूर तालुका शाखेतर्फे रायपाटण कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी साहित्य देण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ...

ग्रामसेवक युनियनकडून कोविड सेंटरला साहित्य
राजापूर :
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या राजापूर तालुका शाखेतर्फे रायपाटण कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी साहित्य देण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, स्टिमर इलेक्ट्रिक किटली, स्टील ताटे, ग्लास, साबण, मेणबत्त्या , स्टेशनरी असे साहित्य कोविड सेंटर येथील डॉ. जुवले, नर्स रूपाली साबळे यांच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण आपटे, सचिव मनोहर नवरे, रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अर्जुन नागरगोजे, उपाध्यक्ष प्रदीप जाधव, महिला उपाध्यक्ष निधी जोशी, माजी अध्यक्ष प्रशांत कांबळी, माजी सचिव आशिष कोलते, पी. डी. पवार, अभिजित कोरे, सुप्रिया मासये, निशांत रायकर, कोविड सेंटरचे कर्मचारी तसेच पत्रकार तुषार जाधव- पाचलकर उपस्थित होते.