माताेश्री ट्रस्टने दिला आराेग्य केंद्राला औषधांचा संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:43+5:302021-05-25T04:35:43+5:30

रत्नागिरी : मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांनी कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता लागणाऱ्या सर्व औषधांचा ...

Matashri Trust donated a set of medicines to the health center | माताेश्री ट्रस्टने दिला आराेग्य केंद्राला औषधांचा संच

माताेश्री ट्रस्टने दिला आराेग्य केंद्राला औषधांचा संच

रत्नागिरी : मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांनी कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता लागणाऱ्या सर्व औषधांचा संच, पीपीई कीट, फेस शिल्ड, फेस मास्क व हॅण्ड सॅनिटायझर असे सर्व साहित्य राजापूर तालुक्यातील जैतापूर आरोग्य केंद्राकडे दिले़. मनोज चव्हाण हे मातोश्री ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील अनेक कोविड रुग्णालयांना भेट देऊन आवश्यक औषधांचा पुरवठा करत आहेत.

जैतापूर आरोग्य केंद्रात औषधे व इतर साहित्याची गरज असल्याची माहिती मनसेचे कार्यकर्ते जयेंद्र कोठारकर यांना कळली़. त्यांनी ट्रस्टचे रत्नागिरी प्रमुख अरविंद मालाडकर यांच्यामार्फत डॉ. मनोज चव्हाण यांना ही परिस्थिती सांगितली. त्यानंतर वादळग्रस्तांच्या भेटीसाठी कोकण दौऱ्यावर असलेले मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व शिरीष सावंत, तसेच खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते ही मदत आरोग्य केंद्राला देण्यात आली. तसेच अजून साहित्य लागल्यास त्याचीही पूर्तता करण्यात येईल, असेही सांगण्यात आले़

यावेळी डॉ. मनोज चव्हाण यांच्यासोबत ट्रस्टचे संदीप परब, सचिन रणदिवे, रत्नागिरी प्रमुख अरविंद मालाडकर, बिपिन शिंदे, पंकज पंगेरकर, अमोल श्रीनाथ, श्रीकृष्ण पेडणेकर, अमोल साळुंखे, सुनील साळवी, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. परांजपे यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते.

----------------------

माताेश्री सेवाधाम आराेग्य सेवा ट्रटच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील धारतळे येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला औषधांचा संच देण्यात आला.

Web Title: Matashri Trust donated a set of medicines to the health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.