शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:02 IST

देवरुख पोलिस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली

देवरुख : येथील वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास घडली आहे. अक्षरा अरविंद मोहिते असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली असली तरी त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे.देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२१) रात्री अक्षरा या नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपल्या होत्या. त्यांचे पती वाहनचालक म्हणून काम करतात. त्या रात्री ते घरी नव्हते. घरामध्ये अक्षरा, त्यांचा सात वर्षाचा मुलगा आलोक आणि त्यांच्या पतीची मावशी असे तीनच लोक होते.सोमवारी (दि.२२) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आलोकला लघुशंकेसाठी जाग आली. त्यावेळी त्याला आई बिछान्यावर दिसली नाही. त्याने घरातच राहणाऱ्या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठविले. ताराबाई आणि आलोक यांनी घरात शोधाशोध केली, मात्र अक्षरा दिसल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने आणि ताराबाई यांनी शेजारी राहणारे काका दत्ताराम तुकाराम मोहिते यांना उठवून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुन्हा शोध घेतला असता, घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा या भाजलेल्या अवस्थेत आढळल्या.नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनेची माहिती तत्काळ देवरुख पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अक्षरा यांना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी डिझेलची बाटली, माचिसपंचनाम्यावेळी घटनास्थळी डिझेलची बाटली आणि माचिस सापडली असल्याने अक्षरा यांनी आत्महत्या केली असावी असे सकृतदर्शनी दिसते . त्यांनी पेटवून घेतले की अन्य कोणत्या कारणामुळे त्या जळाल्या याचा तपास सुरू असल्याचे देवरुख पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Married Woman Dies by Burning in Bathroom; Investigation On

Web Summary : In Ratnagiri's Deorukh, a 30-year-old woman was found dead in her bathroom. Police suspect suicide; a diesel bottle and matchbox were found at the scene. Investigations are ongoing to determine the exact cause of death.