शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देणार - उद्योगमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 12:26 IST

अदाणी, अंबानी अशा मोठ्या उद्योजकांसाठी राज्यकर्ते रेड कार्पेट अंथरतात. परंतु, ५० लाखाचा उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योजकाला आम्ही रेड कार्पेटप्रमाणे सर्व्हिस देण्याची आवश्यकता आहे

रत्नागिरी :  महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, याकरिता राज्याचे धोरण उद्योगस्नेही बनवण्यात येईल. उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे काम मोठे आहे. त्यांच्या बरोबरीने उद्योग खाते व शासन म्हणून आम्ही पूर्ण पाठबळ देऊ. उद्योजकांच्या अडचणी, समस्या चेंबरने आमच्याकडे मांडाव्यात, त्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे राहू, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त अंबर हॉल येथे कोकण उद्योग मंथन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, पर्यटन समिती अध्यक्ष संतोष तावडे आदींसह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरीत उद्योग पाहिजेत म्हणणारे फक्त सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. उद्योगाला विरोध करणारे रस्त्यावर उतरत आहेत. समर्थनासाठीही रस्त्यावर उतरले पाहिजे. उद्योग येण्याकरिता त्यांना फक्त इन्सेंटिव्ह देऊन नाही तर स्थानिक लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.उद्योजकांच्या समस्या चेंबर्सने वकिली करून मांडाव्यात. बीच शॅक पॉलिसी आली. परंतु यात ७ वाजता हॉटेल बंद करायचे असेल तर उपयोग नाही, हे मी कॅबिनेट बैठकीत सांगितले होते. तेव्हा मला खुळ्यात काढले. आता या पॉलिसीत सुधारणा करून १० वाजेपर्यंत मुदत दिली जाणार आहे, असे मंत्री म्हणाले.

छोट्या उद्योगांसाठीही रेड कार्पेटअदाणी, अंबानी अशा मोठ्या उद्योजकांसाठी राज्यकर्ते रेड कार्पेट अंथरतात. परंतु, ५० लाखाचा उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योजकाला आम्ही रेड कार्पेटप्रमाणे सर्व्हिस देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता राज्याचे इन्सेंटिव्ह धोरण लवकरच मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत वर्षभरात जिल्ह्याला ५५० कोटी रुपये प्राप्त झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

फ्लिपकार्टसोबत बचत गटांच्या मार्केटिंगची जोडफ्लिपकार्टसोबत महिला बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देण्यात येणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गेली साडेसात वर्षे मी मुंबईतून आलेल्या पालकमंत्र्यांना बचत गटांच्या मार्केटिंगसाठी २ कोटी द्या, असे सांगत होतो. ते का झाले नाही, हे माहीत नाही. बचत गटांना मार्केटिंगसाठी जागा देण्याचे धोरण आम्ही अंमलात आणणार आहोत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत