शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मार्कंडी-बहादूरशेख नाका रस्ता चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:43 IST

Road Sefty Pwd chiplun Ratnagiri-गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी खडतर प्रवास ठरलेल्या मार्कंडी ते बहादूरशेख नाका रस्ता अखेर चकाचक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता नगर परिषदकडे वर्ग झाल्यानंतर नुकतेच डांबरीकरण केले आहे. या कामाविषयी येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे चिपळुणातील नागरिकांसाठी खडतर प्रवास बनलेल्या मार्गाची अखेर दुरूस्तीरस्ता दुरूस्त झाल्याने नागरिकांमधून समाधान

चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी खडतर प्रवास ठरलेल्या मार्कंडी ते बहादूरशेख नाका रस्ता अखेर चकाचक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता नगर परिषदकडे वर्ग झाल्यानंतर नुकतेच डांबरीकरण केले आहे. या कामाविषयी येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.शहरातील मार्कंडी ते बहादूरशेख नाकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे या मार्गावर अपघाताच्या किरकोळ घटनाही घडल्या होत्या. पावसाळ्यात तर खड्ड्यांमधील चिखलमय पाणी पादचाऱ्यांसह अन्य वाहनचालक व प्रवाशांच्या अंगावर उडत होते. यामुळे एकमेकांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या होत्या. या रस्त्याची दुरवस्था पाहता येथील नागरिकांनी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. त्यामुळे रस्ता शहरात असूनही नगरपरिषदेला डांबरीकरण करण्यास अडचण येत होती. यामुळे हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग व्हावा, यासाठी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्यासह नगरसेवक व प्रशासनाने प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नातून हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग झाला. पर्यायाने डांबरीकरणाचा करण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर नगरपरिषदेने १४ व्या वित्त आयोगांतर्गत मार्कंडी स्वामी मठ ते बहादूरशेख नाका कमानीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १ कोटी १९ लाख २३ हजार ९२२ रुपये मंजूर केले.निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह भाजप व महाविकास आघाडी नगरसेवकांच्या उपस्थितीत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन १७ जानेवारी रोजी झाले. यानंतर काम सुरू झाले. नुकतेच या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.बांधकाम सभापतींच्या पत्राविषयी उलटसुलट चर्चारस्त्याचे काम सुरू असताना नगरपरिषदेचे अभियंता, काही नगरसेवकांसह खुद्द बांधकाम समिती सभापती मनोज शिंदे यांनीदेखील या कामाची पाहणी केली होती. असे असताना शिंदे यांनीच आता या रस्त्याच्या कामाबाबत मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत असताना शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीविषयी उलटसुलट चर्चा केली जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरीChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषद