शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मार्लेश्वर शिखराला यात्रोत्सवाचे वेध!

By admin | Published: December 14, 2014 12:07 AM

देवाचं लग्न : हजारोंच्या साक्षीने पार पडतो विवाह सोहळा

मार्लेश्वर : संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) आता वार्षिक यात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मकरसंक्रांतीच्या या यात्रोत्सवाकडे श्री देव मार्लेश्वरावर अगाध श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी हा वार्षिक यात्रोत्सव दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. दि. १५ रोजी श्री देव मार्लेश्वराच्या साखरप्याच्या गिरीजादेवीशी विवाह होणार आहे. देवरुख शहरापासून अवघ्या १८ कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कडेकपारीत, सभोवताली उंचच उंच कडे व हिरव्यागार वनराईत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. देवस्थानच्या समोरच बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आहे. हा धबधबा मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या मनाला भुरळ घालतो तर गुहेमध्ये सापांचा वावर असतो. परंतु आजपर्यंत भाविकाला सापाकडून इजा झाल्याचे ऐकिवात नाही.स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी गुहेमध्ये वसले असल्याने दररोज हजारो भाविक मार्लेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. राज्य शासनाने मार्लेश्वर तिर्थक्षेत्र ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे येथील आल्हाददायक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीही हजारो पर्यटक मार्लेश्वर तिर्थक्षेत्री भेट देत असतात. या स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे मार्लेश्वराच्या भाविकांमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसते. मार्लेश्वराचे देवस्थान हे १८ व्या शतकातील असून देवस्थानचे मूळ शंकराचे लिंग देवरुख शहरापासून केवळ ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या मुरादपूर गावी होते. मात्र तेथील अत्याचाराला कंटाळून शिवलिंगरुपी सत्पुरुषाने जिथे मनुष्यवस्ती नाही व जिथे कोणताही भ्रष्टाचार नाही अशा शांत ठिकाणी जायचे ठरवले. तेथून श्री देव मार्लेश्वर हे आंगवली मठात आले. त्यानंतर ते सह्याद्रीच्या कपारीत असणाऱ्या एका गुहेत जावून राहिले.आंगवली मठाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे. मार्लेश्वराच्या यात्रोत्सवाचा प्रारंभ याच मठातून होत असतो. हा यात्रोत्सव यावर्षी दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये दि. १२ रोजी आंगवली मठात मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, दि. १३ रोजी आंगवली मठात देवाला हळद लावणे व घाण भरणे, दि. १४ रोजी मठाची यात्रा व रात्री १२ वा. मठातून मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान, दि. १५ रोजी श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाह, दि. १६ रोजी मारळ येथे वार्षिक यात्रा, दि. १७ रोजी आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन व दि. १८ रोजी घरभरणीने यात्रोत्सवाची उत्साहात सांगता होणार आहे. (वार्ताहर)