शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगाम लांबणार, हवामान बदलाचा आंबा- काजू पिकावर परिणाम

By मेहरून नाकाडे | Updated: December 9, 2023 14:27 IST

बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार

रत्नागिरी : मधूर स्वाद व अविट गोडीने देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही भूरळ घातलेला हापूस आंबा उत्पादन यावर्षी हंगामापूर्वी होईल अशी अपेक्षा हवामानातील बदलाने फोल ठरवली आहे. आॅक्टोबर हीट चांगली जाणवली, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीही सुरू झाली. त्यामुळे आंबा कलमांना मोहर सुरू झाल्याने बागायतदारही सुखावले होते. परंतु नोव्हेंबरच्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात पुन्हा बदल झाला.

थंडीच गायब झाली. त्यामुळे मोहर प्रक्रिया थांबली. पालवीचे प्रमाण वाढले असून यावर्षी आंबा हंगाम लांबणार असल्याची शक्यता आहे. परिणामी बागायतदारही धास्तावले आहेत. ढगाळ हवामान, थंडी गायब यामुळे कीड रोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत आहे.रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाला व फलोत्पादन लागवडीला चालना मिळाली. जिल्ह्यात १७५३०५ हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. आंबा व काजू ही दोन पिके जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आहेत. आंबा व काजू पिकाला सुरूवातीच्या टप्प्यात मोहर सुरू झाला मात्र मध्येच थांबला आहे. एकूण मोहर प्रक्रिया जेमतेम १५ टक्केच आहे. अवकाळी पावसानंतर हवेतील उष्मा वाढला व थंडी गायब झाली.ठिकठिकाणी पाऊस झाला. ढगाळ हवामानामुळे बुरशी, कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्सचे प्रमाण वाढले. पहिल्या टप्प्यातील मोहराला फळधारणा झाली असून पिक वाचविण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाच्या दृष्टचक्रातून पिक वाचल्यास आंबा मार्चच्या पहिल्या टप्प्यात विक्रीला येईल. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असेल. सध्या पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होवून मोहर येण्यासाठी सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी लागतो.त्यामुळे जानेवारीतच पालवी असलेल्या झाडांना मोहोर येणार आहे. त्यामुळे फळधारणा होवून आंबा एप्रिल-मे मध्येच येण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हुडहुडी भरणारी थंडी होईल अशी अपेक्षा होती मात्र थंडीच गायब असल्याने मोहर कसा येणार? हवामानावर आधारित आंबा, काजू पिक असल्याने बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान