महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, साखळी चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST2021-03-18T04:31:01+5:302021-03-18T04:31:01+5:30

दापोली : तालुक्यातील नवशी फाट्यावरून गावाकडे चालत जात असलेल्या एका महिलेला जंगलमय भागात अडवून एका अज्ञाताने गळ्यातील मंगळसूत्र व ...

Mangalsutra around the woman's neck, stole the chain | महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, साखळी चोरली

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, साखळी चोरली

दापोली : तालुक्यातील नवशी फाट्यावरून गावाकडे चालत जात असलेल्या एका महिलेला जंगलमय भागात अडवून एका अज्ञाताने गळ्यातील मंगळसूत्र व चेन चोरल्याची घटना मंगळवारी घडली.

याबाबत दापोली पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभवे येथील संगीता विजय पाटील मंगळवारी (दि. १६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काही कामासाठी नवशी गावात जात होत्या. नवशी फाट्यावरून जात असताना त्यांना एक अज्ञात इसम रस्त्यावर भेटला. गावाकडे जाणारी एस. टी. बस गेली का, असे त्याने विचारले. आपल्याला माहीत नाही, असे सांगून त्या पुढे निघाल्या. तेव्हा त्या व्यक्तीने पाठीमागून येऊन पाटील यांच्या गळ्यातील ५० हजार ४०० रुपयांचे मंगळसूत्र व २० हजार रुपयांची चेन हिसकावून घेतली. ओरडलीस तर ठार मारेन, अशी धमकीही दिली. संगीता पाटील यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.

Web Title: Mangalsutra around the woman's neck, stole the chain