मंडणगड-नालासोपारा बस कायमस्वरूपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:54+5:302021-09-22T04:35:54+5:30
मंडणगडः तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तिडे तळेघरतर्फे करण्यात आलेल्या मागणीनुसार मंडणगड-तिडे - तळेघर - नालासोपारा बससेवा कायमस्वरूपीकरिता सुरू करण्यात आलेली ...

मंडणगड-नालासोपारा बस कायमस्वरूपी
मंडणगडः तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तिडे तळेघरतर्फे करण्यात आलेल्या मागणीनुसार मंडणगड-तिडे - तळेघर - नालासोपारा बससेवा कायमस्वरूपीकरिता सुरू करण्यात आलेली आहे. ही बस मंडणगडवरून सकाळी ७.४५ वाजता सुटेल. या बससाठी आरक्षण सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही बस मंडणगड, केळवत, पालघर, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, आंबेत, गोरेगाव, माणगाव, रामवाडी, पनवेल, कोकण भवन, नेरूळ, कळवा नाका, ठाणे, घोडबंदर, वसई फाटा मार्गे नालासोपारा येथे सायंकाळी ४ वाजता पोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी सकाळी ६.३० वाजता ही गाडी सुटणार आहे.
या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष शेखर छन्ने, वाहतूक महाव्यवस्थापक संजय सुपेकर, विभागीय वाहतूकचे यामिनी जोशी, दिगंबर भडकमकर, मंडणगड आगारप्रमुख हनुमंत फडतरे, रेल्वे प्रवासी समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष वैभव बहुतुले, कोकण एस. टी. प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अपेक्षित कुळ्ये, उपाध्यक्ष विकास गुरव यांनी केले आहे.