ठाणे सहआयुक्तांवरील हल्ल्याचा मंडणगडातील कर्मचाऱ्यांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:11+5:302021-09-02T05:07:11+5:30
मंडणगड : ठाणे महानगर पालिकेच्या सहआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट २०२१ रोजी आपले कर्तव्य बजावत असताना एका ...

ठाणे सहआयुक्तांवरील हल्ल्याचा मंडणगडातील कर्मचाऱ्यांकडून निषेध
मंडणगड : ठाणे महानगर पालिकेच्या सहआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट २०२१ रोजी आपले कर्तव्य बजावत असताना एका फेरीवाल्याकडून प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची बोटे तोडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. याचबरोबर सहआयुक्तांच्या अंगरक्षकालाही माथेफिरूने जखमी केले. या घटनेचा मंडणगड नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले, लिपिक मनोज मर्चंडे, विकास साळवी, संदीप डीके, नितेश लेंढे, किरण साखरे, अश्विनी खैरे, स्नेहा सापटे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामावर काळ्या फिती लावून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. याशिवाय मंडणगड तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर व पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांच्याकडे या विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनातील माहितीनुसार एक महिला अधिकारी व अंगरक्षकावर अशाप्रकारे भ्याड हल्ला करणे ही अतिशय चिंताजनक बाब असून, शासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.