शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्यावरील नाेंदीसाठी १४ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 17:23 IST

तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. भरणे ग्रामपंचायतीत त्यातील १४ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

खेड : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाेंद करुन मंजूर करुन देण्यासाठी १४ हजारांची लाच घेताना भरणे (ता. खेड) ग्रामपंचायत कार्यालयातील मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. सचिन यशवंत गाेवळकर (४३) असे ताब्यात घेतलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई आज, बुधवारी (१२ जानेवारी) दुपारच्या सुमारास करण्यात आली.भरणे येथील एका ७२ वर्षीय वृद्धाने जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर त्यांच्या नावाची नाेंद घालून ती मंजूर करुन देण्यासाठी अर्ज केला हाेता. या नाेंदीसाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. त्यानंतर तडजाेडीनंतर १४ हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार त्यांनी बुधवारी भरणे ग्रामपंचायतीत १४ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. मंडल अधिकारी यांना रकमेसहीत ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरीचे पाेलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पाेलीस हवालदार विशाल नलावडे, पाेलीस नाईक याेगेश हुंबरे, दीपक आंबेकर, पाेलीस शिपाई हेमंत पवार, चालक पाेलीस शिपाई प्रशांत कांबळे यांचा समावेश हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेडBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी