हॉलिडे स्पेशल नियमित करावी:

By Admin | Updated: September 14, 2014 23:55 IST2014-09-14T22:12:56+5:302014-09-14T23:55:20+5:30

व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते हिरालाल मेहता यांनी मागणी केली

Make holiday specials regularly: | हॉलिडे स्पेशल नियमित करावी:

हॉलिडे स्पेशल नियमित करावी:

चिपळूण : गणपती उत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर १० दिवसांसाठी वसई रोड - रत्नागिरी ही हॉलिडे स्पेशल रेल्वे गाडी सुरु करण्यात आली होती. या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून संबंधित रेल्वे प्रशासनाने ही गाडी नियमित करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते हिरालाल मेहता यांनी केली आहे.
कोकणात गणेशोत्सवाबरोबरच होळी उत्सवालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव दरम्यान १० दिवसांसाठी ००११७/००११८ ही १८ डब्यांची हॉलिडे स्पेशल गाडी सुरु करण्यात आली होती. ही गाडी वसई रोड येथून १.४५ वाजता सोडली जात होती. मात्र, या गाडीच्या वेळेत बदल करुन ती रात्री ८ वाजता सोडल्यास सर्वांनाच या गाडीचा प्रवास सुखकर होईल. वेस्टन रेल्वे कोकण रेल्वेशी कायम जोडली जाईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वसई रोड येथून सुटण्यात आलेली हॉलिडे स्पेशन गाडी नियमित करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर वसईरोड - रत्नागिरी ही हॉलिडे स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली होती. ही रेल्वे व त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता ही रेल्वे कायम करावी, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Make holiday specials regularly:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.