पेशवेकालीन आनंदीबाईंच्या माहेरचे तळे उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:01+5:302021-09-10T04:38:01+5:30

मंदार गोयथळे/असगाेली : गुहागर तालुक्यातील मळण येथील पेशवेकालीन तळे विकासापासून आजही दुर्लक्षित राहिले आहे. हे तळे केवळ गणेश विसर्जनापुरतेच ...

Maher's pond of Peshwa Anandibai neglected | पेशवेकालीन आनंदीबाईंच्या माहेरचे तळे उपेक्षित

पेशवेकालीन आनंदीबाईंच्या माहेरचे तळे उपेक्षित

मंदार गोयथळे/असगाेली : गुहागर तालुक्यातील मळण येथील पेशवेकालीन तळे विकासापासून आजही दुर्लक्षित राहिले आहे. हे तळे केवळ गणेश विसर्जनापुरतेच मर्यादित असून, येथे पर्यटनदृष्टया कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. तळ्याकडे जाणाऱा रस्ता व प्रवासी निवाराशेडची झालेली दुरवस्था पाहता येथील विकासकामांबाबत स्थानिक प्रशासन उदासीनच असल्याचे दिसत आहे.

गुहागर - विजापूर मार्गावरील शृंगारतळीपासून अवघ्या ३ किलाेमीटरवर असलेले मळण गाव ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिध्द आहे ते येथील माहेरवाशीण व पुण्याच्या पेशवे घराण्याची सून आनंदीबाई यांच्यामुळे. आनंदीबाई या आपल्या माहेरी मळण गावला यायच्या. येथील तळे त्यांना आकर्षित करायचे. त्यामुळे या तळ्याला पेशवेकालीन संदर्भ लाभले आहेत. असे हे तळे आजही दुर्लक्षित आहे. पर्यटनदृष्ट्या या तळ्याचा विकास करणे क्रमप्राप्त आहे. या तळ्याचे सुशोभिकरण केल्यास गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना ही मोठी पर्वणी ठरु शकते. तसेच येथील भागाचा विकासही होऊ शकतो. या तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. तळ्याच्या जवळच प्रवासी निवाराशेड असून, ती संपूर्ण मोडलेल्या अवस्थेत आहे. तिचीही दुरुस्ती अद्याप झालेली नाही.

---------------------------

सुशाेभिकरण हाेणे गरजेचे

गुहागर तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. दिवसेंदिवस येथे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. अनेक पुरातन देवस्थाने, गड, किल्ले, गुहा, बीच, पुरातन तलाव पर्यटकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. त्यामुळे गुहागर - विजापूर या मुख्य मार्गावर असलेल्या मळण येथील पेशवेकालीन तळे पूर्णतः विकसित करुन त्याचे सुशोभिकरण केल्यास गुहागरच्या पर्यटन क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल.

Web Title: Maher's pond of Peshwa Anandibai neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.