शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

राजकारणाच्या मैदानात, मैदानावरून राजकारण; मोक्याच्या मैदानांचे बुकिंग

By मनोज मुळ्ये | Updated: May 3, 2024 20:10 IST

महायुतीने रत्नागिरीत एक मैदान तब्बल दहा ते पंधरा दिवस आपल्याच ताब्यात ठेवले

मनोज मुळ्येरत्नागिरी : जाहीरसभेसाठी आपल्या पक्षाला मोक्याचे ठिकाण मिळावे, यासाठी जितके प्रयत्न केले जातात, तितकेच प्रयत्न आपल्या विरोधकांना मोक्याचे मैदान मिळू नये, यासाठीही केले जातात. यातूनच महायुतीने एक मैदान तब्बल दहा ते पंधरा दिवस आपल्याच ताब्यात ठेवले आहे. केवळ ताब्यात ठेवले नाही तर तेथील मंडपही कायम ठेवण्यात आला आहे. याखेरीज रत्नागिरी शहरातील अन्य मैदानांबाबतही महायुतीने महाविकास आघाडीच्या एक पाऊल पुढे टाकले आहे.विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये जाहीर प्रचारसभेला खूप महत्त्व आहे. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या, त्यातही स्टार नेत्यांच्या सभा पदरात पाडून घेणे यासाठी प्रत्येक उमेदवार धडपडत असतो. अशा सभांचा लोकांवर परिणाम होतो. सभा घेणारा नेता जितका प्रसिद्ध, तेवढी त्याला मागणी अधिक. अर्थात केवळ वक्ता चांगला एवढाच निकष पुरेसा होत नाही. सभा कोठे घेणार, यालाही महत्त्व असते.त्यामुळे सभेचे ठिकाण लोकांसाठी सोयीस्कर हवे, पार्किंगची व्यवस्था नीट करता यावी अशा कारणांसाठी सोयीचे मैदान मिळवण्यावर राजकीय पक्षांचा भर असतो. स्वत:ला मैदान मिळावे आणि विरोधकाला मैदान मिळू नये, यासाठीच्या हालचालीही आवर्जून केल्या जातात. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोरील जवाहर मैदान, शिर्के प्रशालेसमोरील मैदान महायुतीने आधीच ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सभा जलतरण तलावाशेजारील मैदानात घेण्यात आली.

जवाहर मैदानसर्वप्रथम ठरल्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दि. २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत जाहीरसभा होणार होती. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जवाहर मैदानावर मंडपही घालण्यात आला. मात्र हवामानाच्या कारणास्तव हा दौरा स्थगित झाला. आता ही सभा शुक्रवार, दि. ३ मे रोजी त्याच ठिकाणी होणार आहे. मात्र २४ एप्रिलपासून मंडप त्याचजागी आहे. तो काढण्यात आलेला नाही. इतके दिवस हे मैदान महायुतीकडेच आहे.

शिर्के प्रशाला मैदानरत्नागिरीतील शिर्के प्रशालेचे मैदानही मध्यवर्ती ठिकाणी आहे. या मैदानावरही महायुतीच्या सभा झाल्या आहेत आणि ते त्यांच्याच ताब्यात आहे.

चंपक मैदानरत्नागिरी शहरालगतच्या उद्यमनगर परिसरातील चंपक मैदान हे सर्वात मोठे मैदान आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. या मैदानाची क्षमता खूपच मोठी आहे. मात्र या मैदानाला लागूनच मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या भागात खूप मोठी धूळ उडते. म्हणून राजकीय पक्षांनी यंदा चंपक मैदानाकडे पाठ फिरवली आहे. अर्थात या मैदानावर सभा घ्यायची झाल्यास तेवढी गर्दी व्हावी लागते. यासाठीही या मैदानाचा विचार झाला नसावा, अशी चर्चा आहे.

प्रमोद महाजन क्रीडा संकुलही आरक्षितशहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलही सभांसाठी उत्तम आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी या मैदानाचा विचार सुरू होता. मात्र हे मैदान आयपीएलचे सामने दाखवण्यासाठी आधीच आरक्षित झाले होते. दरवर्षी आयपीएलचे उपांत्य आणि अंतिम एवढेच सामने थेट प्रक्षेपित केले जातात. मात्र यंदा आधीपासूनच ते दाखवले जात आहेत. यावरूनही चर्चा रंगत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना