महावितरणला २ कोटी ९५ लाखांचा महसूल
By Admin | Updated: January 15, 2016 00:24 IST2016-01-14T21:22:36+5:302016-01-15T00:24:15+5:30
आॅनलाईन सुविधा : जिल्ह्यातील २० हजार ४०३ ग्राहकांकडून सुविधेचा लाभ; घरबसल्या वीजबिल भरणा

महावितरणला २ कोटी ९५ लाखांचा महसूल
रत्नागिरी : आॅनलाईन सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरणे सोपे झाले आहे. दिवसेंदिवस आॅनलाईनकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह््यातील २० हजार ४०३ ग्राहकांनी या आॅनलाईन सुविधेचा लाभ घेतला असून, यातून महावितरणला २ कोटी ९५ लाख २३ हजार ९८० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
वीजबिल भरण्यासाठी बँका, पोस्ट कार्यालये तसेच पतसंस्थांमध्ये सुविधा उपलब्ध आहे. महावितरण कार्यालयातही वीजबिल भरणा केंद्र सुरू आहे. मात्र, संबंधित ठिकाणी गर्दीमुळे ग्राहकांना रांगेत बराचवेळ उभे राहावे लागते. महावितरणने स्वयंचलित वीजबिल केंद्रही सुरू केले आहे. मात्र, त्याठिकाणी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. सध्या घरोघरी स्मार्टफोन उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध होते. त्यामुळे संगणक, मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करत ग्राहक घरबसल्या वीजबिल भरणा करत आहेत.
चिपळूण विभागातून ५ हजार ७५७ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ६८ लाख ३६ हजार ३४० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. खेड विभागातून ३ हजार ४०० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ६७ लाख ५९ हजार ६६० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर रत्नागिरी विभागातील ११ हजार २४६ ग्राहकांनी या आॅनलाईन सुविधेचा लाभ घेतल्याने १ कोटी ५९ लाख २७ हजार ९८० रूपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. सर्वाधिक महसूल हा रत्नागिरी विभागातून प्राप्त झाला आहे. चिपळूण शहरी भागातून २१६८ ग्राहकांनी ३१ लाख ९५ हजार ४३० रूपये तर ग्रामीणमधील ८३२ ग्राहकांनी १० लाख ६१ हजार ९७० रुपये, गुहागर येथील १९३५ ग्राहकांनी १५ लाख ५२ हजार ९९० रुपये, सावर्डेतील ८२२ ग्राहकांनी आॅनलाईन बील भरणा केल्यामुळे १० लाख २५ हजार ९५० रूपयांचा महसूल चिपळूण विभागातून प्राप्त झाला आहे.
खेड विभागातील दापोली १ मधील ७०१ ग्राहकांनी ११ लाख ८३ हजार ५३० रूपये, खेड येथील ५७७ ग्राहकांनी १० लाख २४ हजार २९० रुपये, मंडणगड येथील ५९४ ग्राहकांनी ५ लाख ७८ हजार ७९० रुपये, दापोली २ मधील ५६० ग्राहकांनी १३ लाख ३१ हजार ३२० रुपये, लोटेतील ९६८ ग्राहकांनी आॅनलाईन बील भरल्यामुळे २६ लाख ४१ हजार ७३० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. रत्नागिरी विभागातील देवरूख येथील ६३० ग्राहकांनी ७ लाख ६१ हजार ६० रुपये, रत्नागिरी ग्रामीण १ मधील १६११ ग्राहकांनी २१ लाख १३ हजार ६५० रुपये, ग्रामीण २ मधील ५२६ ग्राहकांनी १९ लाख ४१ हजार ५५० रुपये, लांजा येथील ५८२ ग्राहकांनी ९ लाख ८८ हजार १९० रुपये, राजापूर मधील ३०२२ ग्राहकांनी १९ लाख ८३ हजार ९० रुपये, राजापूर २ मधील ७८५ ग्राहकांनी ५ लाख ८२ हजार ८० रुपये तर संगमेश्वर येथील ६०४ ग्राहकांकडून ८ लाख २३ हजार २६० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)