शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 18:32 IST

हे आमचे दुर्दैव

रत्नागिरी : महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत असून, तो मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल शून्य होणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे की नाही, तो ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ठरवावा. त्यासाठी आठ कोटी रुपये जिल्हा नियोजनातून देणार आहे. त्यापैकी ३ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहेत, असे अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरीय व जिल्हा परिषद गटस्तरीय ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात नियोजन मंडळाकडून ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च करून मुलांना अमेरिकेला पाठवण्याचे धाडस रत्नागिरी जिल्हा परिषद व नियोजन मंडळाने केले. शेतकऱ्यांची मुले इस्रो, नासाला पाठविण्याचे काम जिल्हा परिषदेने करून रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला ठरला, असेही ते म्हणाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.सरपंच आणि ग्रामसेवक ही गाडीची दोन चाके आहेत. ती विश्वासाने चालली पाहिजेत. दोघांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. गावचा विकास व्हायचा असेल तरी शासनाने ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा उपयोग आपण ग्रामपातळीवर कसा करतो, हे भविष्यातील प्रश्नचिन्ह राहणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. ग्रामपंचायतींना लागेल तेवढा निधी आणि इन्फ्रास्ट्रक्चर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व अन्य उपस्थित होते.

हे आमचे दुर्दैवअब्दुल सत्तार गुवाहटीला गेल्याने कृषिमंत्री झाले आणि मी गुवाहटीला गेल्याने उद्योगमंत्री झालो. त्यानंतर मी या जिल्ह्याचा साडेसात वर्षानंतर पालकमंत्री झालो. साडेसात वर्षे स्थानिक पालकमंत्री दिला नाही, हे आमचे दुर्दैव आहे, अशी खंत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत