महाकाली मंडळातर्फे मदतकर्त्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:35 IST2021-08-28T04:35:07+5:302021-08-28T04:35:07+5:30
खेड : महापुरात कासारआळी येथील तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षितस्थळी आणण्याची मोठी कामगिरी ...

महाकाली मंडळातर्फे मदतकर्त्यांचा सत्कार
खेड : महापुरात कासारआळी येथील तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षितस्थळी आणण्याची मोठी कामगिरी बजावणाऱ्या समाजातील तरुणांचा श्री महाकाली महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
महापुरामुळे अनेकजणांचे संसार वाहून गेले. अनेकांनी डोक्यावरील छप्पर गमावले. अशावेळी कासारआळी येथील तरूण मदतीसाठी धावून आले. या तरुणांनी जीवावर उदार होख़न शिडीवरून काही लोकांना सुरक्षित ठिकाणी आणले, काही लोकांना पोहत जाऊन अन्नपाणी पुरवले. तसेच पुराच्या पाण्यात घरातील किमती वस्तू खराब होऊ नयेत म्हणून योग्य ठिकाणी स्थलांतरित केल्या. महापुरात मदत करणाऱ्या कासार आळीतील त्वष्टा कासार समाजातील अशा धाडसी तरुणांचा सत्कार करण्याची संकल्पना माजी नगराध्यक्ष वैशाली कवळे यांनी मांडली. यावेळी सागर प्रकाश कवळे, अजित मुकुंद कवळे, राजेंद्र सुरेश कवळे, आकाश नारायण वडके आणि प्रतीक अनंत दांडेकर या तरुणांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपाली कवळे, श्रद्धा कवळे, ॲड. हेमंत वडके, सुरेखा कवळे, विशाखा दांडेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.