शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:13 IST

दोन्ही राष्ट्रवादींच्या अडचणीत वाढ

चिपळूण : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ऐनवेळी विविध राजकीय पक्षाचे उमेदवार सरसावल्याने महायुतीसहमहाविकास आघाडीही फुटल्याचे उघड झाले. शेवटच्या क्षणी महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाने ऐनवेळी नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरले.शिंदेसेना व भाजपने युती केली असून, शिंदेसेनेला नगराध्यक्षपदासह १६, तर भाजपला १२ जागा, असा फॉर्म्युला ठरला आहे. अशातच माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्या एकीमुळे मजबूत झालेली महाविकास आघाडी उद्धवसेनेने ऐनवेळी सर्वच प्रभागांत अधिकृत उमेदवार दिल्याने अडचणीत आली आहे. या राजकीय घडामोडींमुळे सद्य:स्थितीत दोन्ही राष्ट्रवादी अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला शिंदेसेना व भाजपने विश्वासात न घेता परस्पर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उमेश सकपाळ यांना दिली. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली. या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी मिलिंद कापडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.एकीकडे महायुतीत राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतही बिघाडी दिसून आली. माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित केला होता. परंतु, काँग्रेस नगराध्यक्ष पदावर ठाम राहिल्याने या दोघांच्याही अडचणीत वाढ झाली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धवसेनेने पक्षाच्या आदेशानुसार शहरातील सर्वच जागांवर उमेदवार दिले. त्यामुळे आता माजी आमदार रमेश कदम व आमदार जाधव यांच्या दिलजमाईतून तयार झालेला फॉर्म्युलाही धोक्यात आला आहे.

आता उरली ‘युती अन् आघाडी’नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटपर्यंत महाविकास आघाडी व महायुतीच्या दृष्टीने चर्चा आणि बैठका सुरू होत्या. मात्र, आता महायुतीतील शिंदेसेना व भाजप अधिकृतपणे एकत्र आले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) वेगळी पडली आहे. त्यातून महायुतीऐवजी केवळ ‘युती’ टिकली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धवसेना व काँग्रेस एकत्र आली आहे. महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यापुढे अलिप्त राहिल्यास येथेही केवळ ‘आघाडी’ शिल्लक राहण्याची चिन्हे आहेत.

कोणी ‘एबी फॉर्म’ घेता का?सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याची भूमिका ऐनवेळी घेतल्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. शेवटी प्रत्येक प्रभागात संपर्क साधून कोणी इच्छुक उमेदवार आहे का, तसेच अपक्षांमधील नाराजांचाही शोध घेण्यात आला. त्यांना पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ देण्यासाठी चढाओढ दिसून आली. एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षा प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी पिशवीमधून एबी फॉर्म घेऊनच फिरत होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Chipalun: Alliances Fracture as Parties Field Candidates in Civic Polls

Web Summary : Chipalun's political landscape shifts as alliances break down before elections. The Shiv Sena-BJP coalition faces challenges from NCP. Uddhav Sena's entry complicates matters for Maha Vikas Aghadi, leaving both alliances strained and uncertain for the upcoming polls.