मधुकर भागवत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST2021-08-28T04:34:36+5:302021-08-28T04:34:36+5:30

केशव जाेशी देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री देव कर्णेश्वर देवस्थानचे विश्वस्त आणि पैसा फंड हायस्कूलचे निवृत्त शिक्षक ...

Madhukar Bhagwat passes away | मधुकर भागवत यांचे निधन

मधुकर भागवत यांचे निधन

केशव जाेशी

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री देव कर्णेश्वर देवस्थानचे विश्वस्त आणि पैसा फंड हायस्कूलचे निवृत्त शिक्षक केशव परशुराम जाेशी (८२) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

शांताराम सावंत

चिपळूण : तालुक्यातील निर्व्हाळ येथील ज्येष्ठ शांताराम सावंत (९८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दाेन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सावित्री रसाळ

गुहागर : तालुक्यातील वरवेल-तेलीवाडी येथील रहिवासी सावित्री यशवंत रसाळ (६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सध्या त्या मुंबई येथे वास्तव्याला हाेत्या.

अब्दुल गजाली

खेड : शहरातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अब्दुल कादिर हमीद गजाली (६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काॅंग्रेस तालुकाध्यक्ष गाैस खतीब यांचे ते निकटवर्तीय हाेते.

सिकंदर पांगारकर

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील सामाजिक कार्यकर्ते सिकंदर युसूफ पांगारकर (६७) यांचे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले. सिकंदर पांगारकर हे कडवई येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते हाेते. ते कडवई विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन होते. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

दत्ता पिंपळकर

खेड : शहरातील ब्राह्मणआळी येथील रहिवासी दत्ता पिंपळकर (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हाेते.

हिरावती टुकरूल

जैतापूर : राजापूर तालुक्यातील पडवे टुकरूलवाडी येथील हिरावती सीताराम टुकरूल (६०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Madhukar Bhagwat passes away