आवाशी (खेड) : रत्नागिरी जिल्ह्याच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील एमआर स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत बुधवारी आग लागून नुकसान झाले. ही आग एका तासात आटोक्यात आल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.बुधवारची सकाळ लोटे परिसराला पुन्हा हादरवणारी ठरली. येथील एमआर स्पेशालिटी केमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीचे कारण अजून समजलेले नाही. कंपनीची शेड पत्र्याची आहे. तेथे धूर कोंडल्यामुळे पत्रे उडाले आणि त्याचा मोठा आवाज झाला.त्यापाठोपाठ धुराचा खूप मोठा लोट पसरला. पत्र्यांचा आवाज आणि पाठोपाठ मोठा धूर यामुळे परिसरातील असंख्य लोक तेथे जमा झाले. अग्निशमन बंबामुळे एका तासात आग आटोक्यात आली. या कंपनीत रिॲक्टर नसल्याने कोणताही धोका झाला नाही. या प्रकारात कोणीही जखमी झालेले नाही. कंपनीचे मात्र खूप नुकसान झाले आहे.ज्यावेळी ही आगीची घटना घडली, तेव्हा कंपनीत २१ कामगार काम करत होते. जेथे प्रत्यक्ष आग लागली, तेथे ३ कामगार होते. सुदैवाने ते वेळीच बाहेर पळाल्याने कोणीही जखमी झाले नाही.
लोटेत पुन्हा आग, सुदैवाने कोणी जखमी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 15:16 IST
Fire Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील एमआर स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत बुधवारी आग लागून नुकसान झाले. ही आग एका तासात आटोक्यात आल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
लोटेत पुन्हा आग, सुदैवाने कोणी जखमी नाही
ठळक मुद्देलोटेत पुन्हा आगसुदैवाने कोणी जखमी नाही