प्रतापराव सावंत यांच्या निधनाने संस्थेची हानी : शेखर निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:33 IST2021-05-12T04:33:00+5:302021-05-12T04:33:00+5:30
सावर्डे : प्रतापराव सावंत यांच्या निधनाने संस्थेची झालेली अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे, असे संस्थेचे कार्याध्यक्ष व ...

प्रतापराव सावंत यांच्या निधनाने संस्थेची हानी : शेखर निकम
सावर्डे : प्रतापराव सावंत यांच्या निधनाने संस्थेची झालेली अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे, असे संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. सह्याद्री शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रतापराव सीताराम सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना सह्याद्री शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बाेलत हाेते़
स्व. निकमसाहेबांना अत्यंत कठीण परिस्थितीतही खंबीर साथ देणारे व त्यांच्या पश्चात संस्थेस मार्गदर्शन करणारे सावंत हे एक कणखर व्यक्तिमत्त्व होते. संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारी माणसे आकस्मिक निघून जात आहेत. त्यामुळे संस्थेस त्यांची वेळोवेळी उणीव जाणवेल असे मत शेखर निकम यांनी व्यक्त केले़ यावेळी प्रा. प्रकाश राजेशिर्के, संस्थेचे सचिव महेश महाडिक, प्राचार्य सुनीतकुमार पाटील, प्रा. उमेश लकेश्री, प्रा. माणिक यादव, प्रा. तानाजी कांबळे उपस्थित होते.
-------------------------
चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेत प्रतापराव सावंत यांना शेखर निकम यांनी श्रद्धांजली अर्पण केली़