आठवीच्या तब्बल ५0 वर्गांना कुलूप !
By Admin | Updated: July 9, 2015 00:04 IST2015-07-09T00:04:01+5:302015-07-09T00:04:01+5:30
शासनाकडून मोठा गाजावाजा करुन प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

आठवीच्या तब्बल ५0 वर्गांना कुलूप !
रत्नागिरी : शून्य पटसंख्येमुळे जिल्ह्यातील आठवीचे ५० वर्ग बंद करण्यात येणार आहेत. गतवर्षी चौथीच्या शाळांना पाचवी व सातवीच्या शाळांना आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते. प्राथमिक शाळांना आठवीचे १७५ वर्ग जोडण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा हायस्कूलकडे असलेला ओढा लक्षात घेता ५० वर्गाना याचा फटका बसला आहे.
शासनाकडून मोठा गाजावाजा करुन प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पदवीधर शिक्षकांअभावी पहिले वर्ष रडतखडत पूर्ण करण्यात आले. मात्र, यावर्षी पटसंख्या घसरल्यामुळे ५० वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु असलेल्या आठवीच्या वर्गात पाल्याला न घालण्याचा पालकांचा कल लक्षात घेता भविष्यात अन्य वर्गांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
ज्या प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत, त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक सोयीसुविधा, पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे. मात्र, शैक्षणिक सोयीसुविधा तसेच प्रयोगशाळा यांचा अभाव निदर्शनास आला आहे. जिल्हा परिषदेकडून या सुविधा न पुरविल्याने विद्यार्थ्यांची परवड झाली आहे. जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सर्वाधिक वर्ग बंद पडले आहेत. त्यापाठोपाठ दापोलीतील वर्ग बंद पडले आहेत. संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील एकही वर्ग बंद पडलेला नाही.
समाजातील सर्व घटकांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने बालकांचा सक्तीचा व मोफत कायदा शासनाने सुरु केला. त्याची अंमलबजावणी करीत असताना काही शाळांना पटसंख्येचा फटका बसला आहे. सुरुवातीला विद्यार्थी व पालकांकडून आठवीच्या वर्गाला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)
तालुका मराठी उर्दूचे बंद
माध्यम वर्ग पडलेले
वर्ग वर्ग
मंडणगड२११०२
दापोली९३१५
खेड२७२७
चिपळूण५००००
गुहागर८११७
संगमेश्वर४७१००
रत्नागिरी८२१ (उर्दू)
लांजा२४१५
राजापूर१५१३
एकूण१६४११५०