लॉकडाऊन वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:05+5:302021-05-25T04:36:05+5:30
२. आरोग्य कर्मचारी हे देवदूत असून कोरोना महामारीमध्येही जीव ओतून काम करीत आहेत. या महामारीमध्ये उपचार करण्यापासून ते ...

लॉकडाऊन वाढणार
२. आरोग्य कर्मचारी हे देवदूत असून कोरोना महामारीमध्येही जीव ओतून काम करीत आहेत. या महामारीमध्ये उपचार करण्यापासून ते लसीकरण करण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कोकणनगर येथील लसीकरण केंद्रात एक वयस्कर आजी यांना चालताही येत नसल्यामुळे तिथे सेवा बजावत असणाऱ्या परिचारिकेने त्यांना रिक्षामध्ये लस दिली. या परिचारिकेच्या कामगिरीबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारे इतरही आरोग्य कर्मचारी लोकांची सेवा बजावत आहेत. पण, कोणाच्याही ही बाब लक्षात येत नाही. सेवा बजावताना मागेपुढे न बघता प्रामाणिकपणे काम करून लोकांना बरे करण्यावर भर दिला जात आहे.
३. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. मात्र, काही व्यापारी या प्रयत्नांना छेद देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. अशा व्यापाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही ती वेळ पाळली जात नसल्याची ओरड सध्या शहर परिसरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तरीही काही दुकानदारांकडून नियम तोडण्याचे प्रकार सुरू आहेत.