शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास केंद्रातून स्थानिकांना रोजगारासह अर्थचक्रास चालना मिळणार - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:18 IST

कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल तसे दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथेही असेच केंद्र उभारले जाईल.

रत्नागिरी : रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून  स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होण्यासोबतच स्थानिक अर्थचक्रास गती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.या विकास केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन यावेळी सामंत यांच्या हस्ते झाले. जिल्हयात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने हे केंद्र मदत करेल असे सांगून ते म्हणाले की, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात या स्वरुपाचे केंद्र माझ्या खात्यातर्फे उभारण्यात येईल तसे दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे गाव असणाऱ्या तासगाव येथेही असेच केंद्र उभारले जाईल.शासकीय तंत्रनिकेतन परिसरात हे केंद्र बांधले जाणार आहे. त्या इमारतीचे काम ९ महिन्यात पूर्ण होईल व नंतरच्या काळात प्रतिवर्षी ५ अभ्यासक्रम असे १५ कौशल्य अभ्यासक्रम येथे सुरु करण्यात येणार आहे. हे राज्यातील पहिलेच केंद्र असून येथे  पुढील ३ वर्षात क्षमतावृध्दी करीत साधारण  ३००० विद्यार्थी प्रतिवर्षी हे कौशल्य प्राप्त करायला सुरुवात होईल.स्थानिक ठिकाणची गरज लक्षात घेऊन येथे पर्यटन,हॉटेल,कृषी आणि अन्न अभियांत्रिकी आदि अभ्यासक्रम सुरु होत आहेत. ज्यातून स्थानिक उद्योगास असणारे मनुष्यबळ आणि रोजगार यांची सांगड घातली जाईल. आगामी काळात रत्नागिरी विमानतळ सुरु झाल्यावर त्या व्यवसायाला कौशल्य अभ्यासक्रमांना देखील यात सामिल करण्यात येणार आहे.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात हा सोहळा झाला. याला उद्योग जगतामधील व्यक्तींचीही उपस्थिती असावी, असे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्थानिक उद्योजक दीपक गद्रे (गद्रे मरीन्स), तरुणकांत दवे (जेएसडब्लूचे  वरिष्ठ उपाध्यक्ष), एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मगदूम, संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ,  राज्य तंत्रशिक्षण महामंडळाचे डॉ. विनोद मोहितकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. विनोद मोहितकर यांनी तर सूत्रसंचालन पूर्वा पेठे हिने केले .

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत