शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना सूचविणार : व्ही. गिरीराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 20:45 IST

जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त

ठळक मुद्देरत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांशी चर्चा

रत्नागिरी : जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी सुमारे तीन तास व्ही. गिरीराज यांनी रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांचे प्रश्न व मागण्या समजावून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, नगराध्यक्ष राहूल पंडीत, राजेश बेंडल, सुरेखा खेराडे, उल्का जाधव तसेच अधिकारी उपस्थित होते.मोठया नगरपालिकांना भांडवली वाढीसाठीच्या उपाययोजना याच बरोबर गुजरात, केरळ राज्यात व्यवसाय कर, स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वसूल होतो, अशा नवनवीन उपाययोजना सुचविणार असल्याचे स्पष्ट करुन व्ही गिरीराज म्हणाले की, याबाबत आयोगाने राज्यातील सर्व जिल्हयांचा दौरा केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाº्यांशी सविस्तर चर्चा केली आहे.

हा आयोग पाच सदस्यीय असून कायमस्वरुपी व ठोस उपाययोजना सूचविण्यावर आयोगाचा भर राहणार आहे. नगरपालिकांचा जास्तीत जास्त खर्च पिण्याच्या पाणी योजनांवर होत असतो याबाबतही काय करता येईल याचाही विचार सुरु आहे. क वर्ग नगरपालिकांचा विकास आराखडा, शहरात उद्याने व बागा, कंपोस्ट डेपो आदी बाबींसाठी व भूसंपादनासाठी नगरपालिकांना अनुदान मिळावे यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे आयोगाच्या विचाराधिन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेमार्फत जमिन महसूल, वाढीव उपकरांसारखे दहा विविध उपकर वसुल केले जातात. या उपकरांची रक्कम वाढवून मिळावी, रस्ते, पाणी, फळझाड लागवड, पर्यटन आदि विकास योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेला स्वतंत्र निधी मिळावा, नगरपालिकांचा भुयारी गटार योजना, पाणी योजना, पर्यटन विकासाच्या योजनांना भरीव तरतूद मिळावी, सीआरझेड कायदा शिथील करावा, सहाय्यक अनुदान वाढवून मिळावे, नागरी सुविधा अंतर्गत मिळणारे अनुदान  वाढवावे, नगरपालिकाक्षेत्र व लोकसंख्या यांचा विचार होऊन अनुदानाची तरतूद व्हावी आदि मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.   प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वागत केले तर शेवटी नगरपालिका प्रशासनाच्या शिल्पा नाईक यांनी आभार मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीfundsनिधीRatnagiriरत्नागिरी