शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

खेडमध्ये जंगलात दारुअड्ड्यावर छापे, चाैघांना अटक; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By अरुण आडिवरेकर | Updated: July 6, 2023 14:29 IST

खेड : दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७ वाजता छापा ...

खेड : दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७ वाजता छापा टाकला. या छाप्यात एकूण चार जणांना अटक केली आहे. तसेच ६,६०,८७० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात एका ठिकाणी बेवारस हातभट्टी पाेलिसांना आढळली.मंगेश दगडू निकम, सुरेश रुमाजी निकम, संतोष जयराम निकम, अशोक लक्ष्मण निकम (सर्व रा. खेड) अशी अटक केलेल्या चाैघांची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी जिल्ह्यात कोठेही अवैध दारूधंदे सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच गुन्हे प्रतिबंध, गुन्हे तपास आणि अवैध धंद्याविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस योजना सुरू केली आहे.खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुनगेकर यांना खेड पोलिस स्थानक हद्दीमध्ये काही ठिकाणी हातभट्टी दारूधंदे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने मौजे कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १ किमीच्या जंगलमय व डोंगर भागांमध्ये ओढ्या जवळ असणाऱ्या हातभट्टी दारूधंद्यावर धडक कारवाई केली. पाेलिसांनी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या हातभट्टीसाठी लागणारा दारुसाठीचा गूळ, नवसागर, हातभट्टी दारू असा एकूण ६,६०,८७० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुनगेकर, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पाेलिस उपनिरीक्षक सुजित सोनवणे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल दीपक गोरे, महेंद्र केतकर, दिनेश कोटकर, विक्रम बुरोंडकर, पाेलिस काॅन्स्टेबल विनय पाटील, रमेश बांगर, रुपेश जोगी, अजय कडू, राहुल कोरे, कृष्णा बांगर व महिला पाेलिस काॅन्स्टेबर लतिका मोरे यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस