शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

liquor ban Ratnagiri : रत्नागिरी येथे देशी विदेशी मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 15:16 IST

liquor ban Ratnagiri : रत्नागिरी शहरातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळील रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने छापा टाकून २८,८९६० रुपये किमतीचा देशी विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने करण्यात आली. याप्रकरणी अविनाश सीताराम दळवी (४४, रा. रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी येथे देशी विदेशी मद्याचा साठा जप्तराज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने टाकला छापा

रत्नागिरी : शहरातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळील रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी येथे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने छापा टाकून २८,८९६० रुपये किमतीचा देशी विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने करण्यात आली. याप्रकरणी अविनाश सीताराम दळवी (४४, रा. रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटी येथे देशी विदेशी मद्याचा साठा करण्यात आला असल्याची माहिती भरारी पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. यानुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी ओमगौरी चायनीज सेंटर येथून देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केला.तसेच संशयित लॉकडाऊनचा फायदा घेऊन त्याचे स्वत:चे वाहनातून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याच्या हुंदाई आय १० गाडीची झडती घेतली असता. त्यामध्ये देशी विदेशी मद्याचा साठा आढळला. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, जवान विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत अवैध गावठी दारूची व गोवा बनावट मद्याची विक्री होण्याची शक्यता अधिक आहे. अवैध दारूची विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.- व्ही. व्ही. वैद्य,प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागRatnagiriरत्नागिरी