शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड किल्ल्यावरील झुडपात गाडलेले मुख्य प्रवेशद्वार प्रकाशात, मोहिमेदरम्यान आलं समाेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:08 IST

साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच हे प्रवेशद्वार असून, त्याचा घेरा /देवड्याचा परिसर २१ बाय २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढा आहे.

मंडणगड : मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड, माती  व झाडी झुडपात लुप्त झालेला मुख्य प्रवेशद्वार प्रकाशात आणला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या अभ्यास मोहिमेदरम्यान हा दरवाजा समाेर आला.गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता. गडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली.हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून, या ठिकाणी राजमार्ग ही आहे. साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच हे प्रवेशद्वार असून, त्याचा घेरा /देवड्याचा परिसर २१ बाय २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढा आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून, त्यावर ढासळलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत.सध्या गडावर प्रवेश करतो तो डांबरी रस्ता गडाचा पूर्वीचा मुख्य मार्ग नसून त्याच्या खालच्या बाजूला मुख्य राजमार्ग आहे. या मार्गाने (प्रवेशद्वाराने) प्रवेश केल्यावर थेट गणेश मंदिराच्या दिशेला बाहेर पडतो. या अभ्यास मोहिमेत गडाचा पूर्ण परिसर अभ्यासून पुढील संवर्धन कार्याची दिशा ठरविण्यात आली. या मोहिमेत योगेश निवाते, ललितेश दवटे, अमित महाडिक, अमोल भुवड, अमित भुवड, सोमेश बुरुनकर, सुयोग मयेकर, सिद्धेश जाधव, सागर पाटील आणि गणेश रघुवीर हे उपस्थित होते.

संवर्धन कार्यसह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धन कार्य करत आहे. मंडणगड किल्ल्यावर असलेल्या तोफेला लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा बसविण्यात आला तसेच गडावरील धान्य कोठार आणि घरांच्या जोत्याचे अवशेष स्वच्छ करण्यात आली. त्याचबराेबर प्रतिष्ठानतर्फे गडावर सूचनाफलक दिशादर्शक लावण्यात आले.

गडावरील या मुख्यप्रवेशद्वार उजेडात आल्यामुळे आज गडाची आणखी एक महत्त्वाची दुर्गवास्तू शिवप्रेमींना पाहता येईल. या प्रवेशद्वार संवर्धनाची जबाबदारी सह्याद्रि प्रतिष्ठान मंडणगड विभाग घेत आहे. - राहुल खांबे, विभाग प्रमुख, मंडणगड.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी