शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:47 IST

शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंतमालगुंड येथे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे उद्घाटन

रत्नागिरी : शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.मराठी विज्ञान परिषद मध्यवती व रत्नागिरी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक येथे १८ ते २० जानेवारी या कालावधीत ५४वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी उदय सामंत बोलत होते.रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान स्वागताध्यक्ष मधुमंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

२०१२च्या एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे, या भूमीने अनेक भारतरत्न दिले अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य मी समजतो, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारच्या सत्रात उच्च शिक्षणातील संधी या विषयावर अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र होणार आहे. सायंकाळच्या सत्रात प्रा. रेखा सिंघल यांचे काजू आंबा फणस यांची उपयोगिता या विषयावर व्याख्यान होईल.

मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे. त्यानंतर रविवार, १९ जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल. अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास आयोजित करण्यात आला आहे 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी