वाचनालये प्रबोधनाबरोबरच परिवर्तन घडवतात

By Admin | Updated: October 25, 2015 23:31 IST2015-10-25T22:55:52+5:302015-10-25T23:31:43+5:30

अरूण इंगवले : चिपळुणात माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन

Libraries create changes along with awakening | वाचनालये प्रबोधनाबरोबरच परिवर्तन घडवतात

वाचनालये प्रबोधनाबरोबरच परिवर्तन घडवतात

चिपळूण : आजवरच्या जगभरातील सामाजिक व राजकीय क्रांती या पुस्तकांमुळेच झाल्या आहेत. विचारवंताच्या लेखनातून व त्यांच्या वाचनातूनच समाजाची जडणघडण होत असते. त्यातूनच समाज बदलासाठी किंंवा नव्या क्रांतीसाठी तयार होत असतो. त्यामुळे मानवी जीवनात वाचनालय व गं्रथालयाचे स्थान महत्वाचे आहे. कारण वाचनालये सामाजिक प्रबोधन व परिवर्तन घडवण्याचे काम करत असतात, असे प्रतिपादन चिपळुणातील ज्येष्ठ साहित्यिक अरूण इंगवले यांनी केले.
चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समितीच्या ‘शिक्षण समिती’च्या वतीने संस्थेच्या चिपळुणातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात ‘माता रमाई आंबेडकर वाचनालय, चिपळूण’ चे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक अरूण इंगवले, ज्येष्ठ कादंबरीकार, साहित्यिक श्रीराम दुर्गे व संस्थेच्या मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष रामदास गमरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत होते. यावेळी बुध्द धम्म प्रचार समिती, चेंबूर मुंबईचे केंद्रीय सदस्य राजू कदम, मुख्य कमिटी मुंबईचे उपाध्यक्ष रामदास गमरे, शिक्षण कमिटी मुंबई अध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष विठोबा पवार, हिशेब तपासणीस आनंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, आनंद कदम, संस्थेचे सरचिटणीस अशोक कदम, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संदेश पवार, उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, सुदेश गमरे, सुहास पवार, खजिनदार जगदीश कांबळे, हिशेब तपासनीस दिवाकर जाधव, रमाकांत सकपाळ, न. प. अधिकारी अनंत हळदे, दिलीप मोहिते, धम्म कमिटीचे अध्यक्ष अनंत पवार, संजय मोहिते उपस्थित होते. कार्याध्यक्ष विठोबा पवार यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी संस्थेच्या व शिक्षण समितीच्या कामांचा आढावा घेतला. प्रास्ताविकात शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार यांनी वाचनालय सुरू करण्यामागची भूमिका विषद करून अनेक दात्यांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. तसेच याप्रसंगी सर्व देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते, अंजली कदम, भिमराव जाधव, उल्हास कदम, राजेश मोहिते, प्रवीण जाधव, मनोहर कदम, प्रकाश गमरे, शिवदास तांबे, नारायण जाधव, संजय जाधव, संतोष पवार, तुकाराम सकपाळ, प्रकाश कदम, मेजर दत्ताराम मोहिते, प्रभाकर सकपाळ, सीताराम कदम, एस. डी. गायकवाड, सुधीर मोहिते, मनोज पवार, प्रकाश पवार, विलास सकपाळ, गौतम जाधव, सुरेंद्र मोहिते, निर्मला कांबळे, अशोक सकपाळ आदी प्रमुख कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)


वाचनानेच माणूस समृध्द होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांडपंडीत होते. त्यांनी अध्ययनाच्या व वाचनाच्या बळावरच सर्वोच्च स्थान पटकावले. त्यामुळे ते विश्ववंदनीय ठरले. आपणही रोज चांगले वाचन केले पाहिजे. कारण आपण ज्या वातावरणात राहतो, ते वातावरण वैचारिकदृष्ट्या गढूळ आहे. त्यामुळे अनेकदा आपल्यावर चुकीचे संस्कार होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपण स्वत: वाचन केले, तरचं खरे काय? खोटे काय? ते कळू शकेल.


वैचारिक वातावरण गढूळ.
मानवी जीवनात वाचनालय, ग्रंथालयाचे स्थान महत्वाचे.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीतर्फे कार्यक्रम.

Web Title: Libraries create changes along with awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.