कोरोना राेखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुया : वैशाली माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST2021-09-05T04:36:00+5:302021-09-05T04:36:00+5:30
राजापूर : गणेशोत्सवामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची साऱ्यांनी काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम कृती दल आणि ...

कोरोना राेखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुया : वैशाली माने
राजापूर : गणेशोत्सवामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची साऱ्यांनी काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम कृती दल आणि प्रशासन या साऱ्यांनी कोरोना रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली माने यांनी केले.
गणेशोत्सवामध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे त्या संबंधित चर्चा करून कोरोनाला रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी माने, तहसीलदार शीतल जाधव यांनी ग्राम कृती दल, सरपंच यांच्यासह प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह नायब तहसीलदार अशोक शेळके यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्राम कृती दल सदस्य उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी माने यांनी कोरोनाला रोखण्यासाठी गणेशोत्सवामध्ये कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, गावामध्ये येणाऱ्या मुंबईकरांकडून प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. गणेशोत्सवामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून त्याची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शीतल जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी रवींद्र नागरेकर, खरवतेचे सरपंच दिनेश चौगुले, ससाळेच्या सरपंच शोभा तांबे, गोवळचे सरपंच अभिजीत कांबळे, नगरसेविका शीतल बोटले, शुभांगी सोलगावकर, दिवाकर आडविरकर आदींनी चर्चेत भाग घेतला हाेता.