पणिक्कर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवूया : विकास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:48+5:302021-07-02T04:21:48+5:30
पाचल : पणिक्कर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आज तुमच्या, आमच्या खांद्यावर आहे. पणिक्करांनी केरळमध्ये ...

पणिक्कर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवूया : विकास पाटील
पाचल : पणिक्कर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आज तुमच्या, आमच्या खांद्यावर आहे. पणिक्करांनी केरळमध्ये ग्रंथालय चळवळ उभी करून ६,००० ग्रंथालये जोडली. त्यांनी चालवलेली ग्रंथालय चळवळ केरळच्या साक्षरतेसही कारणीभूत ठरली. वाचन संस्कृतीचे जतन झाल्यास निश्चितच आपल्याबरोबरच देशाचीही प्रगती होईल आणि पणिक्करांचा हा वसा आणि वारसा आपण पुढे चालवूया, असे प्रतिपादन डॉ. विकास पाटील यांनी केले.
ते श्री मनोहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत आयोजित वाचन दिन विशेष उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ऑनलाईन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम होते. कार्यक्रमात प्रारंभी ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी महाविद्यालयाने हाती घेतलेल्या ‘पुस्तक आपल्या घरी’ या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
परिवर्तन व्हावे ही साऱ्यांचीच इच्छा असते पण त्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे. त्यासाठी आपण अधिकाधिक वेळ वाचनासाठी द्या, असे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ग्रंथपाल एम. आर. कोंडागुर्ले, स्नेहा कोलते, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. डी. पाटील यांनी केले तर प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी आभार मानले.