शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण घेऊ ते मराठा म्हणूनच घेऊ, चिपळुणातील क्षत्रिय मराठा समाजाची एकमुखाने मागणी

By संदीप बांद्रे | Updated: January 17, 2024 17:56 IST

चिपळूण : कोकणात मराठा कुणबी समाजात वाद नाहीत. येथील जाती व्यवस्था, रितभात वेगळी आहे. मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळायला ...

चिपळूण : कोकणात मराठा कुणबी समाजात वाद नाहीत. येथील जाती व्यवस्था, रितभात वेगळी आहे. मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळायला हवे. मराठ्यांचे कुणबीकरण केल्यास भविष्यात मराठा जातच नष्ट होईल. यातून कोणत्याही जातीला कमी लेखण्याचा हेतू नाही. त्यामुळे शासनाने कोकणातील मराठ्यांना मराठा म्हणून टिकणारे आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी चिपळूणात झालेल्या क्षत्रिय मराठा समाजाच्या कोकण मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.मराठा आरक्षणाबाबत समाजात जागृती होण्यासाठी शहरातील भैरी मंदिराजवळील मैदानात बुधवारी कोकण प्रांत मराठा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासह रत्नागिरी जिल्ह्यासह सिधुदुर्ग, रायगड, मुंबई, कोल्हापूर, येथील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात सुधीर राजेभोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा इतिहास सांगितला. मेळाव्याचे समन्वयक राजन घाग म्हणाले, कोकणातील मराठा समाज स्वाभीमानी आहे. आम्ही वेगळी भूमिका घेतरी तरी समाजात फूट पाडण्याचा हेतू नाही. ज्यांना कुणबी म्हणून दाखले हवेत, त्यांनी ते स्विकारावेत, त्याला आमचा विरोध नाही. मात्र शासनाने आम्हाला टिकणारे आरक्षण मराठा म्हणूनच द्यावे. ओसीबीत ३५१ जातींचा समावेश असल्याने त्यातच मराठा समाजाला आरक्षण दिल्यास लोकसंख्येच्या तुलनेने या समाजाला न्याय मिळणार नाही. कुणबी म्हणून आरक्षण मिळाल्यास तिसऱ्या पिढीत मराठा जात नष्ट होईल.यानंतर मराठा आरक्षणाचे अभ्यासक व मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी तपशिलवार माहिती दिली. ते म्हणाले की, सोशल मिडीयावर मराठा समाज आरक्षणाबात संभ्रम करणारे लेखन करू नये. ओबीसीतील ठरावीक जातीच मराठ्यांना विरोध करीत आहेत. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढल्याने आरक्षणात असलेली दरी काही प्रमाणात भरून निघाली. हे आंदोलनाचे यश मानावे लागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी चार पर्याय आहेत. मराठा कुणबी प्रमाणातपत्र घेतल्यास ओबीसीतून आरक्षण मिळू शकेल. खुल्या प्रवर्गातील १० टक्के राखीव असलेल्या इडब्ल्यूएस मधूनही आरक्षण घेता येईल. या १० टक्केत ८ टक्केचा लाभ मराठा समाजाला मिळतो आहे. गायकवाड समितीने मराठा आरक्षणाबाबत ३८०० पानांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यातील काही तांत्रिक बाबींवर न्यायालयाने आक्षेप घेतल्याने तेथे आरक्षण मिळाले नाही. मागासवर्ग आयोगाच्या आधारे समाजाचे मागासलेपण सिद्ध करून आरक्षण मिळवावे लागेल. त्यासाठी आगामी कालावधीत होणाऱ्या सर्व्हेक्षणात समाज बांधवांना जाणीवपुर्वक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पुर्वी मराठा समाजातील लोकांच्या शेकडो एकर जमिनी असायच्या. आता त्या गुंठेवारीत आल्या आहेत. मराठा समाजाने आपली भूमी जपली पाहिजे, ती विकता कामा नये. मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात मागासलेपण असून लोकसंख्येनुसार आरक्षण मिळायला हवे. यापुढील कालावधीत समाजातील प्रगल्भ लोकांनी समाज पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही केले.या मेळाव्यास माजी मंत्री रविंद्र माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, संजय खानविलकर, संकेत साळवी, अविश कदम, अजित साळवी, निखील साळवी, बाळा कदम, रामदास राणे, बळीराम शिंदे, अरविंद चव्हाण, चित्रा चव्हाण, मधूकर दळवी, चंद्रकांत मोरे, नेहा गावकर, शेखर पालांडे, तुषार कागले, दिलीप पाटील,  अॅड. अभिजीत सावंत यांच्यासह कोकणातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaratha Reservationमराठा आरक्षण