शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

‘आराखडा रद्द’चा ठराव शासनाकडे देणार

By admin | Updated: March 10, 2016 23:58 IST

चिपळूण पालिका : नगरपरिषदेच्या सभेत ठराव संमत

चिपळूण : शहराचा प्रारुप विकास आराखडा हा स्थानिक प्राधिकरण म्हणून नगरपरिषदेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता व शहरातील नागरी, व्यापारी, संस्था यांच्या हिताच्या आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा, हा आराखडा तयार करण्याचे अधिकारी नगरपरिषदेला मिळावेत, असा ठराव नगरपरिषदेच्या मुख्य सभेत करण्यात आला असून, तो मुख्यमंत्र्यांकडे लवकरच पाठविला जाणार आहे. माजी आमदार रमेश कदम, शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर, नगरसेवक लियाकत शाह यांनी शहरातील नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्याबाबत हरकती व सूचनांचा विचार करावा, हा आराखडा रद्द व्हावा याबाबत शासनाला कळवण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार नगर परिषदेच्या मुख्य सभेत आराखड्यावर चर्चा झाली. या आराखड्याबाबत इएलयु नकाशा उपलब्ध नाही. जमीन वापर नकाशावरील अहवाल, योजनेचा मसुदा तयार करण्याचे प्रयोजनासाठी केलेले सर्वेक्षण अहवाल प्राप्त झालेला नाही. लोकसंख्येबाबत देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये फार मोठ्या प्रमाणात चुका आहेत. भविष्यातील जनगणना करण्याकरिता वापरलेली सूत्र यामध्ये आकडेवारीत चुका आहेत. नगर परिषदेकडे विविध शासकीय विभागांकडून आरक्षणाची मागणी नसतानासुध्दा विकास आराखड्यामध्ये शासनाच्या विभागाचे आरक्षणही दाखवण्यात आले आहे. नगर परिषद कर्मचारी, अधिकारी वसाहतीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रयोजन करण्यात आलेले नाही. नगर परिषद हद्दीत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची पटसंख्या व भविष्यात होणारी पटसंख्या याचा कोठेही ताळमेळ बसत नाही. तरीसुध्दा शहरातील विविध भागामध्ये आरक्षणे दर्शविण्यात आली आहेत. आराखड्यावर सर्व्हे नंबर व सिटी सर्व्हे नंबर स्पष्टपणे दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आराखडा पडताळून हरकती घेता आलेल्या नाहीत. हा आराखडा करताना २००६ची भौगोलिक परिस्थिती विचारात घेण्यात आली आहे. २००६नंतर २०१५ पर्यंत नगर परिषदेने अनेक परवाने देऊन इमारती पूर्ण झाल्या आहेत. अशा इमारतींवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत. शासनाने शहराची टीपी स्किम मंजूर केली आहे. त्यामध्ये अंतिम भूखंड रस्ते व नागरी सुविधा नमूद केल्या आहेत. त्याप्रमाणे नगर भूमापन यांच्याकडे नगर परिषदेने स्वतंत्र मालमत्ता पत्रिका करण्यासाठी कळवले आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे, असे असतानाही यामध्ये आरक्षणे दाखवण्यात आली आहेत. ज्या जमिनीवर नगर रचना विभाग व नगर परिषद यांच्या मंजुरीने इमारती, उद्योग व्यवसाय सुरु आहेत, अशा जागांमध्ये आरक्षणे टाकलेली आहेत ते पूर्ण चुकीचे असून, अशा जागा विकास आराखड्यातून वगळण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)शहरातील गावठाण व अतिदाट वस्तीच्या भागातून अस्तित्त्वात असणाऱ्या ६ मीटर व ९ मीटर रस्त्याला १२ मीटर रुंदीचे वायडिंग दर्शविण्यात आले आहे. बाजारपेठेमध्ये १२ मीटरऐवजी १५ मीटर वायडिंग दाखविण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या नागरिकांचे इमले उद्ध्वस्त होणार आहेत. त्याची नुकसान भरपाई देणे नगर परिषदेला परवडणारे नाही. त्यामध्ये अनेक नागरिक भूमिहीन व बेघर होणार आहेत. प्रारुप विकास आराखडा तयार करताना मूळ आरक्षणांच्या जमीनमालकांचे त्याच जमिनीवर पुन्हा आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीच्या आराखड्यात जी आरक्षणे आहेत, त्यापैकी ८० टक्के आरक्षणे अद्याप विकसित झालेली नाहीत, अशा परिस्थितीत आवश्यकता नसताना नवीन आरक्षणांची संख्या वाढल्याने चिपळूण शहरातील नागरिक भूमिहीन होणार आहेत.