शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: फासकीत अडकलेल्या बिबट्याची साडेतीन तासांनी सुटका, पिंजऱ्यात जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:18 IST

बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नसल्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार

लांजा : वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी सकाळी लांजा तालुक्यातील गवाणे-मावळतवाडी येथे उघडकीला आली. अथक प्रयत्नानंतर या बिबट्याची फासकीतून सुखरूप सुटका करून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे हे गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान मावळतवाडी येथे शेताकडे जात हाेते. त्यावेळी त्यांना बिबट्याची चाहूल लागली. त्याचवेळी बिबट्याने डरकाळी फोडताच त्यांनी घाबरून तिथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या वनाधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगट यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याची फासकीतून सुटका करण्यात आली. पिंजरा बंद करण्यात आलेल्या बिबट्याला गवाणे येथील शासकीय नर्सरीत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नसल्याने त्याला रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.गवाणे मावलतवाडी येथील जंगलमय भागात गणू बांबू करंबेळे यांच्या काजूच्या बागेत अज्ञाताने फासकी लावली होती. यामध्ये हा बिबट्या अडकला हाेता. हा बिबट्या तीन वर्षांचा असून, पहाटे ताे अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.ही कामगिरी रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, राजापूरचे सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, वनपाल न्हानू गावडे, महादेव पाटील, वनरक्षक विक्रम कुंभार, बाबासाहेब ढेकळे, श्रावणी पवार, नमिता कांबळे, सिद्धार्थ हिमगिरे, वन मजूर चंद्रकांत रामाने, तसेच प्राणीमित्र दीपक कदम, मंगेश लांजेकर, मयुरेश आंबेकर, मंगेश आंबेकर यांनी केली.

साडेतीन तासांनी सुटकाफासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका करण्यासाठी सकाळी ९ वाजता सुरुवात करण्यात आली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमाराला त्याची सुटका करून पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले. यासाठी गवाणे येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली.