टेरव येथे बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST2021-09-17T04:37:03+5:302021-09-17T04:37:03+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यातील टेरव येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

A leopard roam at Terav | टेरव येथे बिबट्याचा वावर

टेरव येथे बिबट्याचा वावर

अडरे : चिपळूण तालुक्यातील टेरव येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील कुंभारवाडी, खांबेवाडी, तांदळेवाडी या परिसरात बिबट्याला ग्रामस्थांनी पाहिले आहे.

टेरव परिसरातील कुंभारवाडी, खांबेवाडी, तांदळेवाडी परिसरातील ग्रामस्थांची ये-जा सुरु असते. मात्र, सध्या या परिसरात बिबट्याचे दर्शन हाेत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच स्वप्नाली कराडकर, माजी सरपंच किशोर कदम, अशोक साळवी, शांताराम शिवणकर, अनंत चांदिवडे यांनी वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

Web Title: A leopard roam at Terav