शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरातील चिखली मोहल्ल्यात बिबट्याचे बछडे, वनविभागाने बछड्यास घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:55 IST

बछड्यास उपचाराकरिता पुणे येथील केंद्रात पाठवण्यात आले

सचिन माेहिते

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील चिखली मोहल्ला येथे समीर हुसेन हुजूरे यांच्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली एक बिबट्याचा बछडा दिसून आला. याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच अधिकाऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेऊन त्या बछड्यास ताब्यात घेतले. या बछड्यास उपचाराकरिता पुणे येथील केंद्रात पाठवण्यात आले आहे.तालुक्यातील समीर हुसैन हुजुरे (चिखली मोहल्ला) यांचे राहते घरा मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली बिबट्याचे पिल्लू बसले असल्याची माहिती पोलिस पाटील रुपेश विठ्ठल कदम यांनी वनविभागास दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बिबट्याचा बछडा मोठ्या डालग्याखाली झाकून ठेवल्याचे दिसून आले. घाबरल्याने हा बछडा पळण्याचा प्रयत्न करत होता. ते विहिरीमध्ये पडेल म्हणून त्याला झाकून ठेवल्याचे पोलिस पाटील कदम यांनी सांगितले. त्यानंतर वनविभागाने पाहणी केली. यात बछड्यास कोणतीही जखम नसल्याची माहिती वनविभागाने दिली. बछडा मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे २ ते ३ महिने आहे.   पशुधन विकास अधिकारी देवरूख यांचे मार्फत बछड्याची तपासणी केली असता ते अशक्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यास उपचारासाठी वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठवणेत आले. सदरची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी चिपळूण दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वनअधिकारी देवरूख तौफिक मुल्ला करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग