बिबट्याच्या हल्ल्यातील मदत
By Admin | Updated: August 24, 2014 22:38 IST2014-08-24T21:48:34+5:302014-08-24T22:38:32+5:30
संगमेश्वर तालुका : २८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई

बिबट्याच्या हल्ल्यातील मदत
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गतवर्षी बिबट्याने धुमाकूळ घालून अनेक गावांमधील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ठार मारली होती. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकतीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करुन नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती देवरुख वन विभाग कार्यालयाचे वनपाल तुकाराम यादव यांनी दिली.
गतवर्षी तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामध्ये बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य करुन त्यांना ठार मारले होते. पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मारले गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यानंतर त्या - त्यावेळी वनपाल व वनरक्षकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीसुद्धा वन विभागाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपापले प्रस्ताव सादर केले होते.
हे सर्व प्रस्ताव देवरुख वनविभाग कार्यालयाकडून चिपळूण येथील विभागीय वनअधिकारी कार्यालयात मंजूरीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी परिपूर्ण प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली. यामध्ये निवेखुर्दमधील विठ्ठल माईन यांची एक शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. त्यांना २ हजार ६२५ रुपये नुकसान भरपाई मिळाली तसेच कुटगिरीमधील लक्ष्मीबाई येडगे यांची गाय ३७५० रुपये, किरदाडी येथील सुरेश पेडणेकर यांचा बैल ३ हजार रुपये, किरदाडी येथील बाबासाहेब कदम यांचा बैल ५ हजार २५०, कुटगिरी बाबू येडगे यांचा बैल ९ हजार, कोसुंब सुरेश पांचाळ यांची पाडी २ हजार २५० रुपये, कुटगिरी धोंडिबा येडगे यांची गाय ५ हजार २५०, कुडवली नामदेव नवेले यांचा बैल ७ हजार ५०० रुपये, कुटगिरी बाबु येडगे यांची गाय मारल्याने ५ हजार २५० रुपये, मेघी मनीषा मोरे यांची पाडी ३ हजार ३७५ रुपये देण्यात आले.
देवधामापूरमधील मंगेश बाईत यांचा बैल ३ हजार ३७५, कनकाडी गजानन धावडे यांची शेळी १ हजार ६८८ रुपये, मुर्शी बिऱ्या जांगळी यांची शेळी ३ हजार ७५०, कनकाडी महादेव मराठे यांची शेळी २ हजार २५०, बेलारी बुद्रुक महेश सुर्वे यांचा बैल ५ हजार २५०, मुर्शी गणपत जांगळी यांची शेळी ३ हजार, करंजारी गणेश मावळणकर यांचा पाडा २ हजार २५०, करंबेळेतर्फे देवळे दिलीप गोताड यांची शेळी ४ हजार ५०० रुपये, वांझोळे दिनेश कदम यांचा बोकड ४ हजार ५००, देवडे संतोष मोरे यांची गाय २ हजार २५० रुपये, पुर्येतर्फ देवळे तुकाराम कोलापटे यांचा बैल ६ हजार ७५० रुपये.
फुणगूसमधील प्रभाकर दसोई यांची शेळी २ हजार २५०, करंबेळेतर्फे देवळे सखाराम धावडे यांची शेळी ४ हजार ५००, असुर्डे शर्मीला पानगले यांची गाय ३ हजार, लोवले नथुराम साळवी यांचा बैल ४ हजार १२५, कोसुंब शिवाजी जाधव यांचा बैल ६ हजार, आंबवली अनंत भेरे यांचा बैल ५ हजार ६२५ व पिरंदवणे येथील सुरेश घेवडे यांचा बैल बिबट्याने मारल्याने सहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर)