शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना त्रास द्याल तर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री उदय सामंत यांचा बँकांना इशारा

By शोभना कांबळे | Updated: March 13, 2024 13:57 IST

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई ...

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी आढावा बैठकीत दिला.राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ९६५ असून, त्यापैकी ६४५ प्रकरणे मंजूर झाली आहेत. एकूण ३ हजार ३६ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ हजार १३६ प्रकरणे बँकांकडून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. शिवाय १५४० प्रकरणे नाकारण्यात आली आहेत.यात खासगी बँकांचा अधिक समावेश आहे. शासकीय बँकांची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँक आॕफ इंडियाने १८८, बँक आॕफ महाराष्ट्र १३३, स्टेट बँक आॕफ इंडिया ५९, युनियन बँक आॕफ इंडिया ६३, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ८९ प्रकरणे मंजूर केली आहेत.पालकमंत्री सामंत आढावा घेताना म्हणाले की, ५ टक्के रक्कम लाभार्थ्याची,  ३५ टक्के रक्कम शासनाची असताना आणि या प्रकारणात शासन शिफारस करत असुनही अशी प्रकरणे कोणत्या आधारावर नाकारली जात आहेत?. ज्या बँकांची कामगिरी शून्य आहे, त्याचबरोबर ज्या खासगी बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही, प्रकरणे नाकारली आहेत, अशा प्रकरणात तरुण बेरोजगारांना नाहक त्रास देण्याचा उद्देश दिसतो. अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर अशा बँकांमधील शासकीय खाती काढून घेतली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.१४ तारखेपर्यंत बँकांना दिलेले जिल्ह्याचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले. या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच.एन.आंधळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक सूर्यकांत साठे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbankबँकUday Samantउदय सामंत